ग्रॅन्ड सेंट्रल मॉल परिसरात १२२ वाहनांवर दंडात्मक कारवाई

नवी मुंबई ः सीवुडस्‌ ग्रॅन्ड सेंट्रल मॉल परिसरातील सेक्टर-४० आणि सेक्टर-४२ भागात नो-पार्किंग झोन मध्ये उभ्या असलेल्या आणि रस्ते, पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या १२२ वाहनांवर विशेष मोहिमेद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महापालिका बेलापूर विभाग कार्यालय, एनआरआय सागरी पोलीस ठाणे आणि सीवुडस्‌ वाहतूक शाखेच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून सदर कारवाई करण्यात आली.

बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती, एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील तसेच पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि सीवुडस्‌ वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन भिंगारदिवे यांच्या उपस्थितीत बेलापूर विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून बेकायदेशीर पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.

दरम्यान, यापुढील कालावधीतही देखील वाहतूक पोलीस विभाग शिस्त आणि नियंत्रणाच्या दृष्टीने अशा प्रकारची कारवाई राबविण्यात येणार असल्याची माहिती पवन भिंगारदिवे यांनी दिली. 

 

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

तार खिळे असल्याचे भासवून रक्त चंदनाची होणार होती तस्करी