तळोजा व आजुबाजुच्या परिसरात चैन स्नॅचींगच्या घटनांत वाढ

नवी मुंबईच्या हद्दीत चैन स्नॅचींग करणारी दुक्कली जेरबंद 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चैन स्नॅचींगचे गुन्हे करणाऱया दोन सराईत लुटारुंना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. इसरार मन्सुर मुल्ला (26)व रुषिकेश भारत खांदेकर (26) अशी या लुटारुंची नावे असून त्यांनी नवी मुंबईच्या हद्दीत 9 चैन स्नॅचींगचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी या लुटारुंकडुन लुटलेले दागिने तसेच चैन स्नॅचींग करण्यासाठी वापरण्यात आलेले तीन मोटारसायकल असा सुमारे सव्वा पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.  

तळोजा व आजुबाजुच्या परिसरात चैन स्नॅचींगच्या घटनांत वाढ होऊ लागल्याने तळोजा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने या गुह्यांच्या तपासादरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या चैन स्नॅचींगच्या गुह्यांचा तपशील संकलीत केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील संशयीतांचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन चैन स्नॅचींग करताना वापरलेल्या वाहनांचे प्रकार, चोरीचे ठिकाण, चोरीची वेळ व वार, वाहनांवर बसलेल्या आरोपींचे वर्णन याचे तपशीलवार वर्गीकरण केले. त्यांनतर सदर माहितीच्या आधारे तांत्रिक तपासाद्वारे चैन स्नॅचींगचे गुन्हे करणा-या गुन्हेगारांची यादी तयार करुन या आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.  

या तपासा दरम्यान चैन स्नॅचींग करण्यासाठी तळोजा भागात आलेल्या दोन लुटारुंची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने गत  29 ऑगस्ट रोजी इसरार मुल्ला व रुषिकेश खांदेकर या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी तळोजा, खारघर, कळंबोली, पनवेल शहर, खांदेश्वर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 चैन स्नॅचींगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करुन त्यांनी चैन स्नॅचींगचे गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या तीन महागडÎा मोटारसायकल, तसेच त्यांनी लुटलेले दागिने असा सुमारे सव्वा पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ग्रॅन्ड सेंट्रल मॉल परिसरात १२२ वाहनांवर दंडात्मक कारवाई