नेरुळ मधील शिरवणे भागात एकाच इमारतीतील दोन घरफाेड्या

शिरवणेत एकाच इमारतीतील दोन घरात सव्वा चार लाखांची घरफोडी  

नवी मुंबई : घरफोड्या  करणा-या चोरट्यांनी सोमवारी नेरुळ मधील शिरवणे भागात एकाच इमारतीतील दोन घरे फोडून सदर घरातील सुमारे सव्वा चार लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.  

शिरवणे सेक्टर-१ मधील साई सबेरा अपार्टमेंट या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणारे शामबाबु पंजियार (४६) हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेला होता. यावेळी घरामध्ये एकटीच असलेली त्याची पत्नी सायंकाळी ४. ३० वाजता मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेली होती. याच कालावधीत अज्ञात चोरटÎाने पंजियार यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील सुमारे १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पंजियार यांच्या घराचा कडी कोयंडा तुटल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पंजियार यांना दिली. त्यानंतर त्यांनी घरी धाव घेतली.  

याच कालावधीत सदर चोरटयांनी पंजियार यांच्या शेजारी राहणारे राजेश मकवाना यांच्या घराचा देखील कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे २ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पंजियार आणि मकवाना या दोघांनी नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचा पान शॉपवर छापा