विसर्जन मिरवणुकीतील राडयानंतर ऐरोलीतील माजी नगरसेवक एम.के.मढवी पिता पुत्रासह 10 ते 15 व्यक्तींवर गुन्हा दाखल  

नवी मुंबई : गणपती विसर्जनासाठी जाताना ऐरोलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के.मढवी व भाजपाचे कार्यकर्ते सुदर्शन जिरगे या दोघांच्या मंडळाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यात हाणामारी झाल्याची घटना ऐरोली सेक्टर-7 मध्ये शुक्रवारी रात्री घडली. या घटनेनंतर रबाळे पोलिसांनी एम.के.मढवीसह त्यांचे पुत्र करण मढवी, पत्नी विनया मढवी यांच्यासह 10 ते 15 कार्यकर्त्यांविरोधात वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.  


अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 9.30 च्या सुमारास गणपती विसर्जनाला जाताना ऐरोली सेक्टर-7 मधील बाबासाहेब आढाव चौकात ऐरोलीतील माजी नगरसेवक एम.के.मढवी व भाजपाचे कार्यकर्ते सुदर्शन जिरगे या दोघांच्या मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका आमने सामने आल्या. त्यामुळे या दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वादावादी झाली. या वादावादीचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. यावेळी मढवी यांच्या कार्यकर्त्यांनी पुर्व वैमनस्यातून सुदर्शन जिरगे व त्यांच्या मंडळाच्या पदाधिका-यांना शिवीगाळ करुन लोखंडी सळ्या, काठÎ यांनी मारहाण केल्याची तक्रार जिरगे यांनी केली आहे. तसेच मढवी यांनी आपल्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तसेच आपल्या भावाला चावा घेतल्याची देखील तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी एम.के.मढवी, करण मढवी, विनया मढवी, संदिप राणे, अनिल मोरे, शैलेश पाटील, राज यादव, राकेश म्हात्रे, व इतर 10 ते 15 व्यक्तींविरोधात मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे या सह गर्दी करुन दंगल माजवणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.  

 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नेरुळ मधील शिरवणे भागात एकाच इमारतीतील दोन घरफाेड्या