पनवेल मधील कोन गावात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या 5 बांग्लादेशी नागरिकांना अटक

नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील कोन गाव येथे बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या पाच बांग्लादेशी नागरिकांना पनवेल तालुका पोलिसांनी गत बुधवारी रात्री अटक केली आहे. या कारवाईत पकडण्यात आलेले बांग्लादेशी नागरिकांमध्ये 4 महिला व एक पुरुषाचा समावेश असून यातील महिला या हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन त्याठिकाणी बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असल्याचे तपासात आढळुन आले आहे. 

गत आठवडÎात ठाणे शहरातील हिल लाईन पोलिसांनी सोहेल मोहम्मद अली व रोजीना खातुन झाकीर मंडोल या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी रोजीना खातुन या महिलेने तिला पनवेल मधील कोन गावामध्ये मागील एक महिन्यापासून खुशबु नामक महिलेने जबरदस्तीने ठेवल्याची माहिती दिली होती. त्यामुळे हिल लाईन पोलीस त्याबाबत खात्री करण्यासाठी गत बुधवारी रात्री पनवेलमध्ये आले होते. त्यानंतर त्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास कोन गावात जाऊन त्याठीकाणी बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या महिलांकडे रोजीना खातुनबाबत चौकशी केली असता, रोजीना खातुन ही मागील 5 दिवसांपासुन त्यांच्या सोबत स्वखुशीने राहत असल्याचे त्यांनी सांगिलते.  

त्यामुळे पोलिसांनी त्या सर्व महिलांकडे भारतातील वास्तव्याबाबत चौकशी केली असता, ते सर्व बांग्लादेशी नागरीक असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे बांग्लादेशातुन भारतात येण्यासाठी लागणाऱया आवश्यक प्रवासी कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी बांग्लादेशी नागरीक असल्याची तसेच त्यांनी घुसखोरी करुन भारतात प्रवेश केल्याचे कबुल केले. त्यानंतर पनवेल तालुका पोलिसांनी ज्युली बेगम खादीमुल गाजी (37), शंपाबेगम शाहीदुल शेख (25), नादीरा इरशाद शेख (33), रोजीना खातुन झाकीर मंडोल (30) व सोहेल मोहम्मद अली (25) या सर्वांविरोधात पारपत्र अधिनियम 1920 नुसार गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ब्लॅक स्पॉट्सवर आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ व कालबध्द रितीने करण्याच्या सूचना