खाजगी बस चालक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लुटमार

नवी मुंबई--: गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमाण्यांची मोठी लगबग असते. मात्र याचा गैर फायदा घेत गावी जाणाऱ्या या प्रवाशांकडून खाजगी बस चालक अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवशांची लुटमार करीत असतात. याची दखल वाशी उप प्रादेशिक कार्यालयातर्फे अशा बसेसवर करडी नजर असून रविवारी केलेल्या तपासणीत दोन बसेस वर कारवाई करण्यात आली आहे.

सणसुदीला  मुंबईपाठोपाठ उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक गावी जात असतात आणि गौरी गणपती सणात संख्या अधिक वाढते. त्यात विशेषतः  कोकणात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्यामुळे जास्त लोक कोकणात जात असतात.मात्र गरजू प्रवाशांची संख्या पाहता खाजगी बसगाडय़ांचे मालक गेल्या काही वर्षांपासून सणांच्या तोंडावर पुरेपूर  फायदा घेत आलेले आहेत.आणि ऐन सणासुदीला हे खाजगी बस धारक  अव्वा च्या सव्वा दर आकारून प्रवाशांची लूट करतात.

मात्र अशा या लूटमारीला आता आळा घालण्यासाठी परिवहन विभाग सज्ज झाले असून  वाशी उप प्रादेशिक कार्यालयाची या बसेसवर करडी नजर  आहे.त्यासाठी पथके तयार केली असून रात्री अशा बसेस.ची तपासणी केली जात आहे.रविवार २८ ऑगस्ट रोजी एकूण २५ बसेसची तपासणी करण्यात आली असून यात दोन बसेस दोषी आढलल्या.त्यामुळे या दोन बसेस कारवाई करण्यात आली असून त्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली जाणार असून अशी तपासणी सुरूच राहील तर नागरिकांनी देखील त्यांच्या कडून जर चालक जास्त भाडे आकारत असतील तर [email protected] या संकेस्थळावर तक्रार केली तरी कारवाई केली जाईल अशी माहिती हेमांगीनी पाटील, उप प्रादेशिक अधिकारी वाशी, यांनी दिली आहे.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

हेवी डिपॉझीटवर भाड्याने घर देण्याचा बहाणा