से हाय या डेटिंग ऍपवरुन अल्पवयीन मुली व तरुणींना लग्नाचे अमिष दाखवुन लैंगिक अत्याचार

डेटिंग ऍपच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करणारा नराधम अटकेत  

नवी मुंबई : से हाय या डेटिंग ऍपवरुन अल्पवयीन मुली व तरुणींना जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे अमिष दाखवुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या एका नराधमाला तळोजा पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली अटक केली आहे. सुरजभान सिंग (48) असे या नराधमाचे नाव असून त्याने एका अल्पवयीन मुलीसह 3 तरुणींना डेटींग ऍपच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सुरजभान हा सिंग तळोजा फेज-1 मध्ये राहण्यास असून तो इस्टेट एजंट म्हणुन काम करत होता. एक पायाने अपंग असलेला सुरजभान सिंग हा से हाय या डेटींग ऍपवरुन तरुणींसोबत संपर्क वाढवत होता. त्यानंतर चॅटींगद्वारे त्यांच्या कुटुंबाची माहिती मिळवुन वडिल नसलेल्या व गरीब अशा अल्पवयीन तरुणींना आपला जाळ्यात ओढत होता.  

त्यानंतर तो सदर तरुणींना लग्नाचे अमिष दाखवुन त्यांना एखाद्या ठिकाणी बोलावुन घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. लैंगिक अत्याचार करताना तो आपल्या मोबाईलवरुन फोटो काढून ठेवत होता. एखाद्या तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याजवळ असलेले तिचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना तो गफ्प करत होता.  

अशचा पद्धतीने या नराधमाने काही महिन्यापुर्वी ऐरोलीत राहणाऱया एका 16 वर्षीय मुलीला से हाय या डेटींग ऍपच्या माध्यमातुन चॅटींगद्वारे संपर्क वाढविला होता. तसेच तिच्या कॉलेजची फि भरण्याचे अमिष दाखवुन तसेच तिला लग्नाचे अमिष दाखवुन तिला आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर या नराधमाने गत महिन्यामध्ये पीडित तरुणीला  तळोजा येथील घरी बोलावुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले होते. त्यावेळी आरोपी सुरजभान सिंग याने तरुणीचे अश्लिल फोटो काढून तिला धमकावण्यास सुरुवात केली होती.  

सुरजभान सिंग याच्या धमकीमुळे त्रस्त झालेल्या तरुणीने तळोजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरजभान सिंग याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. आरोपी सुरजभान सिंग हा खारघर भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गुरव व त्यांच्या पथकाने त्याला अटक केली आहे.  

या नराधमाच्या अधिक चौकशीत त्याने इतर दोन तरुणींना अशाच पद्धतीने डेटींग ऍपच्या माध्यमातुन लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील एका तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या नराधमाने अशाच पद्धतीने अनेक तरुणींवर अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडुन या नराधमाची कसुन चौकशी करण्यात येत आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 फरार आरोपीकडे सापडले अवैध पिस्तुल