भेसळ युक्त मिठाई विक्री करणाऱ्यांवर आता अन्न औषध प्रशासनाची करडी नजर

भेसळयुक्त मिठाई विकल्यास होणार कारवाई

नवी मुंबई -: गणेशोत्सव सण अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे आणि सणात मोठ्या प्रमाणात मिठाईची मागणी वाढते. ही वाढती मागणी लक्षात घेता अधिक नफा मिळवण्यासाठी काही मिठाई दुकादारांकडून भेसळयुक्त मिठाईची विक्री केली जाते. मात्र अशा प्रकारे भेसळ युक्त मिठाई विक्री करणाऱ्यांवर आता अन्न औषध प्रशासनाची करडी नजर असणार असून त्यासाठी विभागवार भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. अशी माहिती अन्न औषध प्रशासन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

लाडक्या गणरायाचं आगमन आता काही दिवसांवर आले असून घरोघरी हा बाप्पा विराजमान होणार आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी सर्वत्र जोरदार सुरु असून आकर्षक सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठाही सजून गेल्या आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात मिठाईला देखील मोठी मागणी होत असते. मिठाई बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मावा आणि खव्याची गरज लागते. मात्र बाजारात कमी पुरवठा आणि वाढती मागणी पाहता बरेच दुकानदार भेसळ युक्त मावा आणि खव्याचा आधार घेत मिठाई बनवतात. त्यामुळे सणा सुदीला मिठाईची वाढती मागणी पाहता अनेक व्यावसायिक हीच संधी साधत मिठाई पदार्थांमध्ये भेसळ करत मिठाई विक्री करत असतात. मात्र अशा अन्न व औषध प्रशासन विभाग आता सतर्क झाले आहे. भेसळयुक्त मिठाई बनवून नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा त्यांच्याकडून व्यावसायिकांना देण्यात आला आहे. त्यासाठी विभागवार भरारी पथके तयार केली असून भेसळ युक्त मिठाई विक्री करणाऱ्यावर करडी नजर असणार आहे. अशी माहिती अन्न औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

से हाय या डेटिंग ऍपवरुन अल्पवयीन मुली व तरुणींना लग्नाचे अमिष दाखवुन लैंगिक अत्याचार