एपीएमसी मार्केटमधील हत्या प्रकरणातील आरोपीला उत्तर प्रदेशमधुन अटक    

घटनास्थळाच्या आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरुन आराेपीचा शाेध

नवी मुंबई  : एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये राहणा-या रमायण ललसा उर्फ गुरुदेव उर्फ बाबा (43) याची हत्या करुन फरार झालेल्या अरुणकुमार रामभुजारत भारती (32) या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. अरुणकुमार हा रमायण याच्याकडे नेहमी दारु पिऊन जात असल्याने रमायण त्याला दारु पिण्यावरुन चौर चौघांमध्ये ओरडत होता. याच गोष्टीचा राग मनात धरुन त्याने रमायण याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारुन त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

या घटनेतील मृत रमायण ललसा उर्फ गुरुदेव उर्फ बाबा हा एपीएमसीतील भाजी मार्केटमधील डी-551 गाळ्यामध्ये वरच्या मजल्यावर राहत होता. तसेच तो त्याच ठिकाणी भाजी विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवत होता. गत रविवारी सकाळी रमायण ललसा राहत असलेल्या गाळ्यामध्ये मृतावस्थेत आढळुन आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला होता. रमायण ललसा याच्या डोक्यामध्ये कठीण वस्तुने हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आल्याचे आढळुन आल्याने पोलिसांनी अज्ञात मारेक-याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी या आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 वेगवेगळे पथक तयार केले होते.  

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपास तसेच घटनास्थळाच्या आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच साक्षीदारांची चौकशी करुन आरोपीबाबत माहिती काढली असता, आरोपी अरुणकुमार भारती हा मागील महिन्याभरापासून मृत रमायण याच्यासोबत राहत असल्याची तसेच तो या हत्येच्या घटनेनंतर मार्केटमध्नु गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधिक तपासात सदर आरोपी आपल्या मुळ गावी पळुन गेल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे, काटे, पोलीस हवालदार चंद्रकांत कदम, पाटील, आदींच्या पथकाने उत्तर प्रदेश मधील गौंडा जिह्यातील औरव्हा गावात जाऊन आरोपीला अटक केली.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा साठा बाळगणा-या दोघांविरोधात गुन्हा दाखल