केंद्र सरकार कडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न -  नाना पटोले 

नवी मुंबई -:केंद्र सरकार जी एस टी  कर लावला आहे.तसेच अग्निपथ योजना राबवली आहे.आणि केंद्रात सुरू असलेल्या अधिवेशनात अग्निपथ आणि जी एस टी या विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस मागणी करत असताना काँग्रेसच्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.विरोधकांचा आवाज दाबत दडपशाही सुरू ठेवली आहे..म्हणून  हे केंद्र सरकार घालवण्यासाठी काँग्रेस राष्ट्र पातळीवर आंदोलन करत आहे असा दावा वाशी येथे केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या केंद्र सरकारने ऐन श्रावणात जी एस टी कर सर्वच पदार्थांवर लागू केला. देवाला अर्पित करण्याच्या दुधासह इतर वस्तूंवर हा कर लागू केला आहे. मग हे सरकार हिंदुत्वाचा पुरस्कार करून ही कर प्रणाली लादत आहे असे ठणकावत दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनात अग्निपथ योजना आणि जीएसटी या विषयावर चर्चा करायची असताना काँग्रेसच्या खासदारांचे निलंबन करून दडपशाही केली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला तसेच सोनिया गांधी आजारी असताना त्यांच्या मागे इडीची चौकशी लावण्यात आली. हा  एका महिलेचा अपमान आहे असेही ते बोलले. संपूर्ण देशात हे आंदोलन सुरू असून केंद्र सरकार उलथवून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही देण्यात आला. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री असलम खान यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.या आंदोलनात नवी मुंबई शहरातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन थेरपी सुरू करण्याची मागणी