महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन थेरपी सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई -:नवी मुंबई महापालिकेच्या दवाखान्यामध्ये ऑक्सिजन थेरपी नसल्याने रुगांना बाहेर जाऊन वाजवी दरात ही थेरपी घ्यावी लागते. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्यात अशी थेरपी सुरू करावी अशी मागणी शिवसेना माजी नगरसेविका शीतल कचरे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर  यांच्याकडे केली आहे.

एखाद्या रूग्णास जर अर्धांग वायू ( प्यारालेसेस ) सारखा आजार झाल्यास त्यावर ऑक्सिजन थेरपी उपचार पद्धती  ही अतिशय गुणकारी आहे.आणि ही थेरपी उपचार  पद्धती सानपाडा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. मात्र सदर थेरपी ही अतिशय खर्चिक असल्याने  सर्व सामान्य नागरिकांना ती  परवडत  नाही. त्यामुळे ही उपचार पद्धती नवी मुंबई महापालिका दवाखान्यात  चालू केल्यास, नवी मुंबईतील वैदयकीय सुविधेत भर पडून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. त्यामुळे महानगर पालिकेच्या दवाखान्यात अशी थेरपी सुरू करावी अशी मागणी शिवसेना माजी नगरसेविका शीतल कचरे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर  यांच्याकडे केली आहे.

 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणी बैठकीचे आयोजन