तळोजा मधील समस्या सोडवा - काँगेसचे पालिका आयुक्तांना निवेदन 

 
खारघर:  तळोजा वसाहत तसेच पेठाली गावातील रस्त्याची दुरावस्था, बहुतांश गटावरील झाकण नाही. तसेच काही सेक्टर मध्ये  रस्त्यावर  सांडपाणी वाहत असून पालिकेने सदर समस्या सोडवावी अश्या मागणीचे निवेदन तळोजा शहर काँग्रेस कमेटीच्या  शिष्टमंडळाने पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिले.  या शिष्टमंडळात काँग्रेसचे  तळोजा शहर अध्यक्ष  विजय केणी  चिटणीस  बबन केणी, विशाल केणी, नजीर याहू , सोफिन शेख, प्रेमा  नासरीन आदी  उपस्थित होते.
 
   खारघर प्रभाग कार्यालय अंतर्गत असलेल्या पेठाली गाव तसेच  तळोजा फेज एक आणि दोन वसाहती मधील  रस्ते खड्डेमय बनले आहे. विशेषतः तळोजा सेक्टर दोन, तीन चार सेक्टर दहा आणि अकरा मधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे.  तर बहुतांश गटारावरील झाकण गायब झाले आहे. तर काही सेक्टर मध्ये सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे. सदर समस्या घेवून सिडकोकडे गेल्यास सदर वसाहत पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले असल्याचे सांगून काम करण्यास नकार दिले जात आहे.अनेक सेक्टर मध्ये रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पालिकेने सदर कामाला प्राधान्य देवून सदर समस्या दूर करावी अशी मागणी केली. यावेळी आयुक्त देशमुख यांनी  लवकरात लवकर मार्गी लावले जाईल असे आश्वासन दिल्याचे विजय केणी यांनी सांगितले.
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिवाळे गावात ‘स्मार्ट व्हिलेज'चा दुसरा टप्पा सुरु