महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट 10 आमदारांमध्ये प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल :  महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट 10 आमदारांमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश आहे, अशा शब्दांत त्यांचे राज्याचे माजी मंत्री व भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले. ते शनिवारी पनवेल येथे तेली समाज महासंघातर्फे आयोजित बैठकीत बोलत होते. भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. या वेळी पनवेलमध्ये आलेल्या तेली समाजाच्या आमदार व नेत्यांच्या स्वागताचा कार्यक्रम व बैठक शहरातील तेली समाजाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, ज्ञानेश्वर काळे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रांतिक तैलिक महासभेचे कोकण विभाग अध्यक्ष व ओबीसी हक्क परिषदेचे कोकण अध्यक्ष सतीश वैरागी, पनवेल तेली समाज अध्यक्ष राजू जांगडे, विक्रांत डिंगोरकर, संदीप डिंगोरकर, सचिन कापरे, संदेश डिंगोरकर, प्रभाकर डिंगोरकर, प्रकाश जगनाडे, किसन जगनाडे, चंद्रशेखर पन्हाळे, अतुल खंडाळकर, अनिल खंडाळकर, ज्योती जगनाडे, प्रिया डिंगोरकर, सचिन करपे आणि तेली समाजाचे बंधू-भगिनी उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तेली समाजाने आपल्या समस्या सोडवण्यासाठी एकजुटीने काम केले पाहिजे. आम्ही पक्षातर्फे आमदारांच्या कामाचे विशेष सर्वेक्षण केले. त्यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश पहिल्या 10मध्ये आहे. येथील समाज बांधवांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घ्यावी तसेच त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहावे, तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेली समाजाच्या उन्नतीसाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही दिली.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

तळोजा मधील समस्या सोडवा - काँगेसचे पालिका आयुक्तांना निवेदन