एक्सप्रेस वे वर उभ्या ट्रेलरला एसटी बसची धडक,  

नवी मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर बंद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर पाठिमागून भरधाव वेगाने येणारी सोलापूर-अर्नाळा एसटी बस धडकल्याने झालेल्या अपघातात एसटी बस चालकाचा मृत्यू तर बस मधील 19 प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील कोन गावाजवळ घडली. या अपघातातील सर्व जखमींना एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या अपघाताला जबाबदार धरुन ट्रेलर चालक तसेच मृत एसटी चालक या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात एसटी बसचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले आहे.  

या अपघातातील मृत एसटी चालकाचे नाव अभिमन्यु अच्युत गायके (33) असे असून तो मुळचा उस्मानाबाद येथील होता. शुक्रवारी रात्री एसटी चालक अभिमन्यु गायके हा सोलापुर-अर्नाळा (विरार) ही बस घेऊन मुंबईच्या दिशेने येत होता. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याची बस मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर पनवेल जवळ आली असताना,  कोन गावाजवळ एक्सप्रेस मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर अचानक बंद झाल्याने सदरचा ट्रेलर दुसऱया लेनमध्ये बंद स्थितीत उभा होता. पाठिमागून येणाऱया एसटी चालकाला रस्त्यात बंद स्थितीत उभा असलेला ट्रेलर न दिसल्याने सदर एसटी बंद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर जोरदार धडकली. या अपघातात एसटी बस चालक अच्युत गायके हा गंभीर जखमी होऊन जागेवरच मृत झाला.  

तसेच बस मधील एकुण 19 प्रवाशी जखमी झाले असून त्यातील चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातातील ट्रेलर चालकाने आपला ट्रेलर एक्सप्रेस मार्गावरील दुसऱया लेनमध्ये बंद पडल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या वाहनांना कुठल्याही प्रकारचा सिग्नल दिला नाही. तसेच त्याने रिफ्लेक्टर देखील न लावल्याने सदरचा अपघाता घडल्याचे आढळुन आले. त्याचप्रमाणे पाठीमागून येणाऱ्या एसटी चालकाने देखील आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगात चालवुन आणल्याने सदर एसटी बस ट्रेलरवर धडकल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी या अपघाताला दोन्ही वाहन चालकांना जबाबदार धरुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

खाडीकिनारी भागातील संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन