नेरुळमध्ये ई-सिगारेटस्‌ची विक्री-साठा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नेरुळमधील पानटपरी,  पामबीच स्टोअर्समध्ये  ई-सिगारेट विक्री

नवी मुंबई ः ई-सिगारेट विक्री आणि साठा केल्याप्रकरणी नेरुळ मधील अमेय सोसायटीच्या (वाधवा) तळमजल्यावर असलेली पानटपरी तसेच पामबीच स्टोअर्सवर कारवाई करण्याची मागणी ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नेरुळ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांच्याकडे केली आहे.

पामबीच मार्गालगत असलेल्या नेरुळ, सेक्टर-४ येथील प्लॉट क्र.२४ ते २९ वरील अमेय (वाधवा) गृहनिर्माण सोसायटीच्या तळमजल्यावर व्यावसायिकांची दुकाने आणि पानटपरी आहेत. येथील पानटपरी आणि पामबीच स्टोअर्समध्ये युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. तेथील युवकांकडे शासनाने बंदी घातलेले ई-सिगारेट असतात. अमेय सोसायटीतील पानटपरी आणी पामबीच स्टोअर्समध्ये ई-सिगारेट सहजासहजी मिळत असल्याची माहिती मिळत आहे. नेरुळ, सेक्टर-४, २, ६ तसेच नेरुळ पश्चिम-पूर्वेकडील काही भागातील विद्यार्थी, तरुण ई-सिगारेटची नशा करताना पहावयास मिळतात. २० जुलै रोजी पोलिसांनी सदर धाड टाकली असता पानटपरीवर ई-सिगारेटस्‌चा साठा मिळाला. परंतु, पामबीच स्टोअर्समध्ये काहीही सापडले नाही. महत्वाचे म्हणजे पामबीच स्टोअर्समध्ये ई-सिगारेट विक्रीसाठी असतात. पानटपरीवर धाड टाकली असता पामबीच स्टोअर्सला त्यांच्याकडील ई-सिगारेटस्‌चा साठा दडविण्यासाठी वेळ मिळाला. परिणामी, त्याच्याकडे काही सापडले नाही, असे रवींद्र सावंत यांनी नेरुळ पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्या आले आहे.

विभागातील १२ ते १४ वर्षाची मुले पामबीच स्टोअर्समधून ई-सिगारेट विकत घेताना स्वतः आमच्या निदर्शनास अनेकदा आलेली आहेत. युवा पिढी आणि अल्पवयीन विद्यार्थी ई-सिगारेटचे सेवन करु लागल्याने ती चिंतेची बाब आहे. ई-सिगारटेवर बंदी असतानाही पानटपऱ्यावर सहजासहजी होणारी उपलब्धता देखील गंभीर बाब आहे. त्यामुळे सदर घटकांवर वेळोवेळी कारवाई झाल्यास अशा घटनांना पायबंद बसेल आणि युवा पिढी नशेच्या विळख्यातून मुक्तता होईल. त्यासाठी पोलिसांनी याकामी पुढाकार घ्ोणे आवश्यक आहे. दुसरीकडे नेरुळमध्ये ई-सिगारेट सहजासहजी उपलब्ध होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे समस्येचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणेने नियमितपणे येथील पानटपरी आणि पामबीच स्टोअर्सवर धाड टाकून तपासणी करावी.

तेथे असणाऱ्या युवकांचीही धरपकड करुन त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी देखील रवींद्र सावंत यांनी नेरुळ पोलिसांकडे केलीआहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एक्सप्रेस वे वर उभ्या ट्रेलरला एसटी बसची धडक,