कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात खुले आम जुगार सुरू?

नवी मुंबई--: नवी मुंबईतील कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात  पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे खुले आम दिवसा ढवळ्या काळा  पिवळा ठिपक्यांचा जुगार  तेजीत चालवला जात आहे. सदर जुगार अड्डा एका रॅकेट द्वारे चालवला जात असून येणाऱ्या जाणाऱ्या तरुण वर्गाला हे आपले सावज बनवत असून त्यांचे खिसे या जुगारात रीते करवून घेत आहेत. मात्र सदर जुगार हा मागील एक ते दीड वर्षापासून सुरू असून पोलिस त्यावर कारवाई करत नसल्याने नागरिकांनी  पोलिसांच्या कार्यशैलिवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे कोपरखैरणे परिसर सध्या अवैध व्यवसायांचा अड्डा बनत चालला आहे..बोनकोडे गाव परिसरात जुगार अड्डे चालवले जात असल्याची घटना निष्पन्न झाली आहे आणि  घटना ताजी असताना आता रेल्वे स्थानक परिसरात खुलेआम काळा पिवळा ठिपक्यांचा जुगार खेळला जात आहे आणि या जुगाराचा रेल्वे स्थानकमध्ये  येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होत आहे . विशेषतः महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे . या जुगाराच्या खेळात अर्थिक लाभ होत नसला, तरी नुकसान मात्र नक्किच होत आहे.

कारण सदर जुगार चालवणारे रॅकेट हे तरुणांना आपले सावज बनवत आहेत आणि त्यांच्या खिशावर डल्ला मारत आहेत. तर कोपरखैरणेत खुले आम चालणाऱ्या या जुगाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची नाराजी व्यक्त होत असून पोलिसांनी वेळीच हा  जुगार खेळवीण्याऱ्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नेरुळमध्ये ई-सिगारेटस्‌ची विक्री-साठा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी