माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांची घरवापसी

नवी मुंबई ;- नवीन गवते हे शरीराने जरी सेनेत गेले होते तरी देखील ते मनाने आमच्या सोबतच होते.त्यामुळे त्यांचा आज पक्ष प्रवेश नसून घर वापसी आहे असे मत आमदार गणेश नाईक यांनी माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्या भाजप प्रवेशावेळी व्यक्त केले.दिघ्यातील एक मातब्बर नेते म्हणुज समजले जाणारे नवीन गवते,अपर्णा गवते यांनी दीड वर्षापूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत सेनेत प्रवेश केला होता मात्र आता त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने सेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

नवीन गवते जरी शरीराने दूर गेले होते तरी मनाने आमच्यासोबतच होते. एका विशिष्ठ परिस्थितीत त्यांना पक्ष सोडण्याचा  निर्णय घ्यावा लागला होता. गवते हे संदीप नाईक यांच्या संपर्कात होते. दीड महिन्यापूर्वीच ते संदीप नाईक यांच्या समवेत  विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते आणि भाजपात पुन्हा प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. दिघा येथील प्रलंबित प्रश्न सरकारकडे पाठपुरावा करून आपण सोडवू असे नाईक यांनी सांगितले.

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना मला  विशाल मनाने पुन्हा भाजपात स्वीकारल्याबद्दल नाईक यांचे आभार मानले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावरील विश्वास आणि देशाचा तसेच सर्व घटकांचा  विकास करण्याची भाजपाची भूमिका यामुळे पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे, असे नवीन गवते यांनी सांगितले.   तर माजी आमदार  संदीप नाईक यांनी आपल्याला सदैव आधार दिला. त्यामुळे दिघा विभागात  १५० कोटी रुपयांची विकासकामे करू शकलो, असे  यावेळी नवीन गवते यांनी सांगितले. नवीन गवते हे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक होते व दिघ्यातिल एक मातब्बर नेते होते. मात्र दीड वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन बांधल्याने दिघ्यात भाजपला मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र गवते यांच्या घर वापसीमुळे ही पोकळी आता भरून निघणार आहे. यावेळी गवते यांच्या समवेत माजी नगरसेविका ऍड अपर्णा गवते,दीपाली सोन कांबळे.  माजी प्रभाग समिती सदस्य दामोदर कोटीयन, माजी प्रभाग समिती सदस्य संतोष मुळये , चंद्रहान्स सोनकांबळे या गवते समर्थकांनी देखील यावेळी भाजपात प्रवेश केला. आमदार गणेश नाईक यांनी या सर्वांचे भाजपात  स्वागत केले. यावेळी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती डॉक्टर जयाजी नाथ,  माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी नगरसेवक लीलाधर नाईक,  माजी नगरसेवक  सुरज पाटील, माजी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, माजी नगरसेवक विकास झंझाड, विरेश सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेलमधून कट्टर शिवसैनिकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा