पामबीच मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच, 

नवी मुंबई : पामबीच मार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून रविवारी सकाळी पाम बीच मार्गावर वाशीहून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव हुंडाई वेरणा कारने टी.एस.चाणक्य चौकात एक्टिवा स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, स्कूटी चालक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात फेकला जाऊन गंभीर जखमी झाला.त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर हुंडाई वेरणा कार रस्ता दुभाजकावर धडकल्याने सदर कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातातील कार चालक व त्याचा मित्र हे दोघेही मादक पदार्थाचे सेवन करून वाहन चालवत असल्याचे आढळुन आले आहे. एन.आर.आय पोलिसांनी या कार चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. 

या अपघातातील मृत तरुणाचे नाव मनोजकुमार राजकुमार वर्मा (22) असे असून तो करावे गावातील साईवाडी येथे राहत होता. मनोजकुमार हा एन.आर.आय वसाहतीत दूध पुरवठा करण्याचे काम करत होता. रविवारी पहाटे मनोज एन.आर.आय वसाहतीत दूध वितरण केल्यानंतर तो आपल्या एक्टिवा स्कुटी वरून पामबीच मार्गावरून टी.एस. चाणक्य चौकातून करावे गाव येथे वळण घेण्यासाठी पामबीच मार्गावर मधोमध उभा होता.

 याचवेळी वाशीहून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव हुंडाई वेरणा कारने मनोजच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जबरदस्त होती की, मनोज रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात फेकला गेला. यावेळी पाम बीच मार्गालगत मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांनी तेसेच वाहतूक पोलीस गढरी व गवळे यांनी जखमी मनोज वर्मा याला झुडपातून बाहेर काढून तेरणा हॉस्पिटल मध्ये पाठवून दिले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

या अपघातातील कार चालक अक्षय सुर्वे व त्याचा मित्र हे दोघेही मादक पदार्थाचे सेवन करून कार चालवत असल्याचे आढळुन आले आहे. एन आर आय पोलिसांनी कार चालक अक्षय सुर्वे याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणीला पाठविले आहे. या अपघातात हुंडाई वेरणा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसा

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऑनलाईन कपडे खरेदी करणे पडले महागात, 950 रुपये किंमतीचे कपडे पडले 1 लाख 68 हजार रुपयांत