कंटेनरमध्ये लपविलेले३६३ कोटींचे हेरॉईन जप्त

नवी मुंबई ः दुबई येथून कंटेनरमध्ये लपवून आणण्यात आलेले तब्बल ३६३ कोटी (७२.५१८ किलो ग्रॅम) रुपये किंमतीचे हेरॉईन पकडण्याची कामगिरी नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. मार्बल असल्याचे भासवून कंटेनरच्या चारही बाजुमध्ये हेरॉईन लपवून त्यावर वेल्डींग करुन सदरची तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.  विशेष म्हणजे कंटेनर घ्ोण्यासाठी कुणीही न आल्याने न्हावा-शेवा बंदरातील कस्टम तसेच डीआरआय विभागाने या कंटेनरची तपासणी करुन तो पनवेल येथील नवकार लॉजिस्टीक्स या गोडाऊनमध्ये ठेवला होता. या कारवाईत अंमली पदार्थाची तस्करी करणारे कुणीही पोलिसांच्या हाती लागले नसले तरी त्यांचा शोध घ्ोण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.  

न्हावा-शेवा बंदरात परदेशातून आलेल्या एका कंटनेरमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली आणि एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने न्हावा-शेवा बंदरात जाऊन २७ डिसेंबर २०२१ रोजी तेथे आलेल्या कंटेनरचा शोध घ्ोतला असता सदर कंटनेरमध्ये असलेले मार्बल घ्ोण्यासाठी कुणीही न आल्याने तो कंटेनर पनवेल मधील नवकार लॉजिस्टीकमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी नवकार लॉजिस्टीकमध्ये जाऊन कंटेनरची तपासणी केली असता त्यात मार्बल असल्याचे आढळून आले.  

त्यामुळे पोलिसांनी कंटेनर मधील सर्व मार्बल बाहेर काढल्यानंतरही त्यात काहीही न सापडल्याने अखेर पोलिसांनी कंटनेरला वाजवून पाहण्यास सुरुवात केली. यावेळी काही ठिकाणी मोठा आवाज तर काही ठिकाणी संथ आवाज येत असल्याचे आढळून आले. कंटेनरच्या दरवाजाला असलेल्या फ्रेमची बारकाईने पाहणी केली असता फ्रेममध्ये अंमली पदार्थ लपविण्यात आला असल्याचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी कंटेनरचा दरवाजाची प्र्ोÀम कटर मशिनच्या सहाय्याने कापली असता, त्यात अंमली पदार्थाची पाकिटे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी सदर कंटनेरच्या बाजुचे पत्रे कापले असता त्यात एवूÀण ७२ किलो ५७८ ग्रॅम हेरॉईन असे अंमली पदार्थ सापडले. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ३६२ कोटी ५९ लाख रुपये असल्याचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी १५ जुलै रोजी पत्रकार परिषदमध्ये सांगितले.  


सदरचे अंमली पदार्थ अफगणिस्तान येथून दुबईमार्गे आले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांचा शोध घ्ोण्यासाठी एसआयटी तयार करण्यात आली असून एसआयटीच्या माध्यमातून सदर प्रकरणाचा खोलवर तपास करण्यात येईल, असा विश्वास पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी व्यक्त केला.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सुनिल शिंदे, रविंद्र दौंडकर, बासीर अली सय्यद, अंकुश खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, विजय चव्हाण, राणी काळे, तुकाराम कोरडे, अविनाश पाळदे, धनश्री पवार, पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे तसेच पंजाब पोलिसांचे (एस.एस.ओ.सी.मोहाली) पोलीस उपनिरीक्षक कोमलप्रीत सिंह, आदिंच्या पथकाने केली. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पामबीच मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच,