पामबीच मार्गावर होंडासिटी कारला अपघात

नवी मुंबई : पामबीच मार्गावरुन वाशीच्या दिशेने जाणाऱया भरधाव होंडासिटी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात होंडासिट कार (एमएच-01-बीके-6485) रस्ता दुभाजकावर असलेले रेलिंग तोडून विरुद्ध दिशेच्या लेनवर गेल्याची घटना सोमवारी दुपारी करावे गावाजवळ घडली. या अपघातात कार चालक जखमी झाला असुन त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले आहे.  

या अपघातातील जखमी होंडा सिटी कार चालक तरुण सोमवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावरील टी.एस.चाणक्य चौकातुन सीबीडीच्या दिशेने जात होता. यावेळी कार चालकाने अक्षर चौकातून यु टर्न घेतल्यानंतर तो पुन्हा वाशीच्या दिशेन भरधाव वेगात जाण्यासाठी निघाला होता. मात्र होंडासिटी कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर कार पामबीच मार्गावर रस्ता दुभाकासाठी लावलेले रेलिंग तोडून विरुद्ध बाजुच्या लेनवर गेली. या अपघातात कारमधील एअर बॅग उघडले गेल्याने कार चालक बचावला. मात्र या अपघातात तो जखमी झाला.  

सुदैवाने सदर विरुद्ध दिशेने येणाऱया कार दुसऱया कारवर धडकली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती, अशी शक्यता प्रत्यक्षदर्शीकडुन व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कार चालकाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र या अपघातात होंडा सिटी कारचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले आहे. एनआरआय पोलिस ठाण्यात या अपघाताची रात्री उशीरापर्यंत नोंद झाली नव्हती. त्यामुळे या अपघातातील जखमी तरुणाचे नाव समजु शकले नाही. मात्र जखमी तरुण विद्यार्थी असल्याचे समजते.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कंटेनरमध्ये लपविलेले३६३ कोटींचे हेरॉईन जप्त