महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मी कायम शिवसेना सोबतच -विजय नाहटा
नवी मुंबईचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर मदत - विजय नाहटा
नवी मुंबई ः आजही आणि पुढील काळात आम्ही सर्व शिवसेना पक्षातच राहणार असून कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र परिश्रम करणार आहोत. येणाऱ्या काळात सामान्य शिवसैनिकांसाठी काम करणार असून सामान्य कार्यकर्त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जाणार आहेत, अशी स्पष्टोवती शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी उपनेते विजय नाहटा यांनी नेरुळ येथे दिली.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून ‘विजय नाहटा फाऊंडेशन'च्या वतीने शेकडो रिक्षा चालकांना रिक्षासाठी पावसाळी पडद्याचे वाटप ‘विजय नाहटा फाऊंडेशन'चे संस्थापक-अध्यक्ष विजय नाहटा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक ‘शिव वाहतूक सेना'चे अध्यक्ष दिलीप आमले, माजी नगरसेवक रतन मांडवे, उपशहरप्रमुख गणपत शेलार, उत्तर भारतीय सेना संघटक कमेलश वर्मा, विभाग प्रमुख राम बशिष्ट जैस्वाल, तय्यब पटेल, आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिक्षा चालकांच्या अडीअडचणी माहीत असून येत्या काळात रिक्षा चालकांसाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. तसेच नवी मुंबईचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर जी जी मदत होईल ती मदत करण्याचे ना. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. येणाऱ्या काळात रिक्षा चालकांसाठी शिवसेना आणि विजय नाहटा फाऊंडेशन यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदत केली जाणार असल्याचे विजय नाहटा यांनी स्पष्ट केले.