महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अमित ठाकरे यांचे उरण नगरीत जंगी स्वागत
उरण : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे महा संपर्क कार्यक्रमांतर्गत उरण नगरीत जंगी स्वागत करण्यात आले.महा संपर्क व मनविसे पुनर्बांधणी दौऱ्याचे औचित्य साधून मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या उरण येथील जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अमित ठाकरे यांनी तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनविसे पुनर्बांधणी व कार्यकर्त्यांशी महासंपर्क कार्यक्रमांचे आयोजन उरण नगरीत जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवार दि११ जुलै रोजी करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून मनसेचे उरण तालुका प्रभारी अध्यक्ष सत्यवान भगत तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांचे ढोल ताशाच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, तरुणांनी अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत पक्ष प्रवेश केला.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर, मनसेचे प्रभारी तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, शहराध्यक्ष धनंजय भोरे, उप तालुकाध्यक्ष राकेश भोईर, रितेश पाटील, विभाग प्रमुख दिपक पाटील, विद्यार्थी सेनेचे गणेश तांडेल,आकलेश कडू, बबन ठाकूर,सुप्रिया सरफले, अर्चना साळुंखे, कविता म्हात्रे, दक्षता फराडकर, शर्मिला सावंत, ज्योत्स्ना पगारे, मंगेश वाजेकर, सुरेश अय्यर,हितेश साळुंखे,सुरज माळी,अमर ठाकूर, आकाश ठाकूर, जय महानकर, विजय गुप्ता,लक्ष्मण कातकरी, विरेंद्र पवार,सूनील नाईक, पंकज गायकवाड सह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.