पनवेल पालिका हद्दीतील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षा तपासणी करण्याची मागणी

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षा तपासणी करा- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मागणी

खारघर: नवीन पनवेल मध्ये एका शालेय विद्यार्थी  वाहतूक करणाऱ्या वाहनाला लागलेल्या आगीत वाहन जळून भष्म झाले. सदर वाहनात शालेय विद्यार्थी असते तर मोठी दुर्घटना घडली असते, अश्या प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाने  पनवेल पालिका हद्दीतील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षा तपासणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे.या शिष्टमंडळात मनवीसेचे  पदाधिकारी अक्षय  काशीद, नरेंद्र गायकर,ओमकार वेदांत सचिन मोरे,पवन नलावडे आदी सहभागी झाले होते.

     नवीन पनवेल येथील उड्डाणपूल पूल आणि   कांडपिळे सीएनजी पंप जवळ   शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनाला सोमवार ता.5 रोजी अचानक आग लागली आणि काही क्षणात त्या गाडीचा कोळसा झाला , सुदैवाने त्यात कोणतीही जीविहानी झाली नाही,जर त्या वाहनात विद्यार्थी असते तर मोठी दुर्घटना घडली  असती,कोरोनामुळे दोन वर्षानंतर नियमितपणे शाळा सुरू झाल्या आहेत.त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  वाहनाचे तपासणी करताना वाहनात प्रवास करणाऱ्या विद्यार्थीची संख्या, पत्ता,वाहनात सीसीटीव्ही,प्रथोमोपचार पेटी,तसेच वाहन चालकांचा वाहन परवाना आणि आदी तपासणी करणे आवश्यक आहे असे सांगितले. 

     शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात असा  आरोप मनसेविसेचे राज्य सचिव अक्षय काशीद यां वेळी  केला. या वेळी परिवहन विभागाचे  उपायुक्त अनिल पाटील,   परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे  उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मी कायम शिवसेना सोबतच -विजय नाहटा