नवी मुंबईतील  शिवसैनिकांची वाटचाल एक-निष्टतेकडे

 एकनाथ शिंदे यांच्या 'एक'निष्ठ गटात बड्या नेत्यांच्या समावेश

नवी मुंबई -: शिवसेनेच्या ४० आमदारांना घेवून वेगळं गट बनवत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतला. त्यानंतर राज्यात शिंदे समर्थकांची फळी वाढत चालली असून ठाणे पाठोपाठ आता नवी मुंबई शहरातील दोन नेत्यांच्या नेतृत्वात नवी मुंबई शहरातील दिग्गज नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या तंबूत दाखल होऊन नवी मुंबई शिवसेना शिंदे गटात एकनिष्ठ असल्याचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य वडार समन्वय समितीचे अध्यक्ष आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना राज्य मंत्री दर्जा असून ऐरोली परिसरात त्यांचे वर्चस्व आहे.त्यांच्या समवेत तूर्भ्यात वर्चस्व असलेले स्थायी समिती माजी सभापती सुरेश कुलकर्णी,माजी नगरसेवक ममित विजय चौगुले यांच्या सकट सुमारे तीसपेक्षा अधिक माजी नगरसेवक व स्थानिक सेना नेत्यांची मोट बांधणारे राज्यमंत्री दर्जाचे मुंबई झोपडपट्टी महामंडळ अध्यक्ष उपनेते विजय नाहटा यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शिंदे गटात सामील होण्याचे संकेत दिले आहेत. नाहटा हे नवी मुंबई मनपाचे आयुक्त होते.निवृत्तीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांना उपनेतेपद देण्यात आले.याच बरोबर भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यावर त्यांना मुंबई म्हाडा संलग्न मुंबई झोपडपट्टी प्राधिकरण अध्यक्ष म्हणून दिलेली नेमणूक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर कायम ठेवण्यात आले.त्यांनी बेलापूर विधानसभा निवडणूक गणेश नाईक व विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात लढवल्यावर अवघ्या तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. नवी मुंबई मनपाच्या निवडणुका लवकरच घोषित होणार आहेत.या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील सेनेच्या बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची कास धरल्याने नवी मुंबई शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.आणखी दिग्गज माजी नगरसेवक लवकरच शिंदे यांच्या गटात जातील.

विजय चौगुले यांनी शिवसेनेकडून एक वेळा लोकसभा तर दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली असून ते नवी मुंबई शहराचे शिवसेना जिल्हा प्रमुख देखील होते. नवी मुंबई शहरात शिवसेनेचे ३८ नगरसेवक होते.यातील २० नगरसेवक हे चौगुले यांना मानत असल्याने नवी मुंबई शहरात एकनाथ शिंदे यांना मोठी ताकद मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबई शहरातील शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री बंगल्यावर शिवसैनिकांनी जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेवून निष्ठा प्रदर्शित केल्या होत्या.मात्र आता शिवसेनेचा निष्ठावंत आणि एकनाथ शिंदे यांचा "एक"निष्ठ असे दोन गट बघण्यास मिळत आहेत.तर आगामी मनपा निवडणुकीचे रंग पाहून .शिवसेनेचे आणखी काही पदाधिकारी लवकरच शिंदे यांच्याशी एक निष्ठा दाखवण्यासाठी प्रतीक्षेत आहेत अशी चर्चा नवी मुंबईत सुरू आहे.. नवी मुंबई  परिसरातून शिंदे यांना समर्थन वाढत असताना  जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे ,उपजिल्हा प्रमुख महिला संघटक रंजना शिंत्रे,शहरप्रमुख विजय माने यांच्याकडून शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठक घेवून उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाण्याच्या आणाभाका घेण्यात येत आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल पालिका हद्दीतील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षा तपासणी करण्याची मागणी