सुस्थितीत असलेले मैदान आणि उद्यानाच्या कामासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च

मैदान आणि उद्यानाच्या कामाच्या नावाखाली होणारी जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा - खारघर शिवसेना

खारघर : खारघर वसाहतीत सिडकोने कडून उद्यान आणि मैदान विकसित करण्यात आले असताना, सुस्थितीत असलेल्या मैदान आणि उद्यानाच्या कामाच्या नावाखाली होणारी जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावे अन्यथा सुरु असलेले काम बंद पाडण्यात येईल असे निवेदन शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने  पालिका आयुक्त गणेश देशमुख याना देण्यात आले. या शिष्टमंडळात शिवसेनेचे पदाधिकारी रामचंद्र देवरे,उत्तम मोर्बेकर, संतोष गुजर,अनिस तेली यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 
    खारघर वसाहतीत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रहिवासीयांना पुरेसा पाणी मिळत नाही. घंटा गाडीतून होणारी गळती या महत्वाच्या कामासाठी पैसे खर्च करण्या ऐवजी खारघर वसाहतीत सुस्थितीत असलेले मैदान आणि उद्यानाच्या कामासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात  आहे. हे जनतेच्या पैशाची उधळपट्टी  आहे. खारघर सेक्टर दोन मधील उद्यानात मुलांना खेळण्यासाठी खेळणी, सुरक्षा रक्षकाची कॅबिन ,हायमास्ट दिवे ,खुली व्यायाम शाळा असताना पुन्हा या उद्यानासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. खारघर मधील उद्यान सिडकोकडे असताना योग्य प्रकारे निगा राखली जात असे,मात्र पालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर दुरावस्था झाली आहे. पालिका आयुक्तांनी सदर उद्यानाची पाहणी करून गरज असले ते काम करून उद्यान विकसीत करावे. पालिकेने दुर्लक्ष केल्यास सुरु असलेले काम बंद करण्यात येईल असे निवेदन पालिका आयुक्तांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे. 
चौकट - खारघर वसाहतीत सिडकोने उद्यान आणि मैदान विकसित केलेले असताना पालिकेने गेल्या वीस दिवसात खारघर मधील अनेक उद्यान आणि मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले. सदर उद्यान आणि मैदानाचे उदघाटन करताना लावण्यात आलेल्या फलकावर उद्यान आणि मैदान विकसित करण्यासाठी किती पैसे खर्च करण्यात येणार आहे. याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. विकसित असलेल्या उद्यान आणि मैदान विकसितचे काम कश्यासाठी काढण्यात आले आहे. अशी   चर्चा   नागरिकांमध्ये  सुरु आहे. 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील  शिवसैनिकांची वाटचाल एक-निष्टतेकडे