सिवुडमध्ये खाजगी विकासकाने समांतर रस्ता केला बंद ?

नेरूळ सिवुड सेक्टर ४६ ए मध्ये एका खाजगी विकासकाने समांतर रस्ता खाजगी रस्ता असल्यासारखा बंद केल्याचा संशय व्यक्त

नवी मुंबई : नेरूळ सिवुड सेक्टर ४६ ए मध्ये एका खाजगी विकासकाने समांतर रस्ता खाजगी रस्ता असल्यासारखा बंद केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे..मुख्य म्हणजे या साऱ्या प्रकाराबाबत मनपा प्रशासन आणि वाहतूक विभाग अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक बदल, खड्डे खोदणे, किंवा रस्ता बंद करणे यासाठी  मनपा प्रशासनाकडून आयुक्तांच्या अधिकारात वाहतूक विभागाला  प्रस्ताव पाठवला जातो.आणि त्यानंतर वाहतूक विभाग संबंधीत रस्त्याची पाहणी करून गरजेनुसार ना हरकत प्रमाणपत्र देते आणि त्यानंतरच सदर रस्त्यावर खोदकाम वाहतूक बदल किंवा रस्ता बंद केला जातो. मात्र नेरूळ सिवुड सेक्टर ४६ ए येथील भूखंड क्रमांक ५ आणि ५ ए समोरील संपूर्ण समांतर रस्ता खाजगी रस्ता असल्यासरखा एका बाजूला प्रवेश द्वार तर दुसऱ्या बाजूला बाजूला स्टीलचे खांब लावून बंद केला आहे. याठिकाणी आता एका विकासकाने नवीन विकास काम हाती घेतले आहे. त्यामुळे सदर रस्ता हा या खाजगी विकासकाने बंद केला असावा असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. तर याबाबत गायमुख वाहतूक शाखेकडे रस्ता बंद करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मनपा मालमत्ता विभागाकडून ही याबाबत कुठलेच समाधान कारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे  दिवसा ढवळ्या मनपाचा रस्ता बंद केला कुणी असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सानपाडयात अवघ्या 10 मिनीटात दोन महिलांच्या दागिन्यांची लुट