खारघर मध्ये शिवसैनिकांनी जाळला शिंदे,गोगावले यांचा पुतळा

खारघर: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांना घेऊन प्रथम सुरत नंतर आसाम गुवाहाटी येथे गेल्यामुळे शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खारघर मध्ये एकनाथ शिंदे, भरत गोगावले यांचा पुतळा जाळला. मुंबईत विधान परिषद सदस्यांची निवडणूक निकाल हाती येण्यापूर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे काही बंडखोर नगरसेवकांना घेवून सुरत आणि त्यानंतर आसाम गुवाहाटीत दाखल झाले आहे.दरम्यान  मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचे नाराजी दूर करण्या संदर्भात जाहीर आवाहन करून बंडखोराकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे  ठाकरे यांनी आपल्या सर्व भावना बोलून दाखविले. बंडखोरी करणाऱ्याकडे दुर्लक्ष करून गाव, जिल्हा, शहर पातळीवर शिवसेना पक्ष मजबूत करा अश्या प्रकारची सूचना केली होती. त्यानुसार शनिवार ता.25 रोजी खारघर येथील शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, विलास चावरी, सदानंद थरवळ,  माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, अनिल नवघने, जील्हासंघटीका दिपश्री पोटफोडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी जे गेले, त्यांच्या कडे दुर्लक्ष करून पक्ष पुन्हा जोमाने मजबूत करावे अश्या सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. यावेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान बैठक पार पडल्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी बंडखोरांचा निषेध करून जनसंपर्क कार्यालय समोरील रस्त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे  यांचा पुतळा जाळला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख' पदाचा राजीनामा देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय लेटरहेडचा गैरवापर