दिव्यांग मुलांनी राज ठाकरे यांच्या यशस्वी शस्त्र क्रियेसाठी पद यात्रा

राज ठाकरेंना उदंड निरोगी आयुष्य लाभावे म्हणून आई एकविरा देवी चरणी अंध मुलांचा नवस 

नवी मुंबई :-राज ठाकरे यांनी पुण्यातील सभे मध्ये काही अंध मुलांना सन्मानाने व्यासपीठावर बोलावून आदराने विचारपूस करून त्यांचे कौतुक केले म्हणून भारावून गेलेल्या दृष्टिहीन मुलांनी राज ठाकरे यांच्या हिप बोन ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडावी व राज ठाकरे यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे म्हणून आई एकविरा देवी चरणी नवस बोलून ५०० वेळा लोटांगण ( दंडवत ) घालून मावळ ते दादर असा पायी प्रवास करून राज ठाकरे यांना  भेटण्यासाठी  मावळ ते शिवतीर्थ दादर अशी पदयात्रा काढली. चंद्रकांत ढगे, गणेश निंबाळकर,  अजय स्वामी व रिक्षा चालक माणिक खान कोटे अशी त्यांची नावे आहेत. नवी मुंबई सानपाडा येथे सदर मुले आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बाळासाहेब शिंदे व विनोद पार्टे यांनी भेटून  त्यांची  विचारपूस करून शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन राज साहेबांच्या भेटीसाठी रवाना केले. आज राज ठाकरे या मुलांना भेटणार असल्याचे माहिती या मुलांनी दिली..

सत्यवान गाईकवाड, इस्माईल शेख,संजय खंडाळे, अरुण पवार, सचिन साळवी, गणेश निलगोंडे, सुरेश दामा, अनिल चिंदालिया, कृष्णा कांबळे. संदीप घोष,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खारघर मध्ये शिवसैनिकांनी जाळला शिंदे,गोगावले यांचा पुतळा