सामाजिक उपक्रमांच्याद्वारे शेकापचे प्रभुदास भोईर यांचा जन्मदिवस साजरा

 पनवेल : प्रभुदास अर्जुन भोईर उर्फ अण्णा यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने खिडुक पाडा परिसरातील नागरिकांसाठी विनामूल्य दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच कोरोना कालखंडात जीवाची बाजी लावून अत्यावश्यक सेवेसाठी स्वतःला झोकून देऊन कार्य करणाऱ्या प्रभुतींचा संघर्ष योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

       शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या शुभहस्ते दाखले वाटप शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. कोरोना कालखंडात आख्खे जग थांबले होते. परंतु तरी देखील अत्यावश्यक सेवेत स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जनसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा श्रीदत्त चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत ९५ प्रभृतींचा सत्कार करण्यात आला.

               याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाचे वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष प्रभुदास भोईर म्हणाले की नुकताच दहावी आणि बारावी चा निकाल लागला आहे. महाविद्यालयीन प्रवेशाच्या प्रक्रिया करता नानाविध दाखल्याची आवश्यकता भासते. अशावेळी मुलांचे पालक वणवण करत असतात. योग्य मार्गदर्शन मिळत नसल्या कारणाने त्यांची ससेहोलपट होते. म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही आज विनामूल्य दाखले वाटप शिबीर आयोजित केले आहे. तसेच कोरोना कालखंड हा अत्यंत भयावह असा कालखंड होता. या कालखंडामध्ये ज्यांनी ज्यांनी अतुलनीय कार्य केलेले आहे त्यांना सन्मानित करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. या साऱ्या मंडळींनी जीवाची बाजी लावून मानवधर्माची सेवा केलेली आहे. त्यांना गौरविणे हे मी माझे भाग्य समजतो.

       बबन दादा पाटील यांनी प्रभुदास भोईर यांनी केलेल्या प्रगतीची प्रशंसा केली.ते पुढे म्हणाले की मी कितीही व्यस्त असलो तरीदेखील तुझ्या अभिष्टचिंतन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले असा मी त्यांना शब्द दिला होता. वास्तविक आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना माझ्यावर पक्षाने फार मोठी जबाबदारी सोपविली आहे. सकाळच्या सत्रातली काम संपवून मी लगबगीने येथे फक्त प्रभुदास भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.

       यावेळी समाजातील विविध स्तरातील दिग्गज मान्यवरांनी प्रभुदास भोईर यांचे अभिष्टचिंतन करुन त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

       जन्मदिनानिमित्त आणे आयोजित सामाजिक उपक्रमांना यावेळी बबन दादा पाटील यांच्या समवेत आमदार नरेंद्र पवार,अनिल पाटील, म्हाडाचे कोकण विभागीय माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,मोहन मुळीक, उप पोलीस निरीक्षक,वाहतूक शाखा

विजय तळेकर,तहसीलदार पनवेल,लोखंड पोलाद बाजार समिती,सभापती,अशोक गर्ग

संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली. नवीन पनवेल गुरुद्वारा प्रबंधक कमिटी प्रधान बलविंदर सिंग, शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे, नगरसेवक सतीश पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश भोईर, विजय भोईर,विजय पाटील, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, डॉक्टर रुपेश वडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिव्यांग मुलांनी राज ठाकरे यांच्या यशस्वी शस्त्र क्रियेसाठी पद यात्रा