राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उलवे शहर मनसे तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

उरण : .राज ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त उलवे मनसे तर्फे वहाळ पंचायत समिती गणातील उलवे, कोंबडभुजे, गणेशपुरी, तरघर येथील शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप वाढ दिवसाच्या निमित्तने उलवे मनसे चे शहर अध्यक्ष राहुल पाटील व सौ .मनीषा राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून उलवे, कोंबडभुजे, तरघर, गणेशपुरी आदी रा.जी.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून राज ठाकरेचा 54 वा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा झाला. 

सदर कार्यक्रम मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी तालुका अध्यक्ष रामदास पाटील वाहतूक सेनेचे अल्पेश कडू उपतालुका अध्यक्ष संदेश भगत, चित्रपट सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश कोळी.शहर सचिव मनोज कोळी गणेशपुरी शाखा अध्यक्ष चेतन कोळी.उपाध्यक्ष सुनील कोळी उलवे शाळेचे मुख्याध्यापक पदमाकर म्हात्रे .कोंबडभुजे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .नंदिनी भोईर गणेशपुरी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .योगिता काळे .तरघर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .कीर्ती पाटील आदी सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन नरेश पवार यांनी केले तर आभार उलवे शाळेचे मुख्याधापक पदमाकर म्हात्रे यांनी मानले.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

सामाजिक उपक्रमांच्याद्वारे शेकापचे प्रभुदास भोईर यांचा जन्मदिवस साजरा