विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्र पुन्हा एकदा २४ जूनला एकवटणार 

नवी मुंबई :-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मागील वर्षी  जूनला मानवी साखळी इशारा आंदोलना   नंतर  २४ जून रोजी ऐतिहासिक असे आंदोलने करण्यात आले होते. मात्र तरी देखील शासनाने अजून पर्यंत दि बा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीला पाठवले नाही. त्यामुळे दि बां.चे.नाव विमानतळा द्यावे या मागणीसाठी समस्त भूमिपुत्र २४ जूनला पुन्हा एकदा एकवटणार असून सिडकोला घेराव घालणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी भूमिपुत्रांची आग्रही  मागणी असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली आणि सिडकोने तसा ठराव ही मंजूर करून शासनास पाठवला. त्यामुळे समस्त भूमिपुत्र नाराज झाले आणि सदर विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे म्हणून मगील वर्षी भूमिपुत्रांनी ऐतीहासिक असे आंदोलन केले होते तसेच या आंदोलनात  ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी कऱ्हाडी, भंडारी, कुणबी या समाजाच्या भूमिपुत्रांनी या आंदोलनात सहभाग घेत दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पला ग्रामस्थांनी दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी एकमुखाने केली होती. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करून देखील शासनाने अजून पर्यंत त्याची दखल घेतली नाही आणि तसा प्रस्ताव ही तयार केला नाही. त्यामुळे विमानतळाला दि.बा .पाटील यांचेच नाव द्यावे म्हणून समस्त भूमिपुत्र पुन्हा एकदा एकवटणार असून सिडकोला घेराव घालणार आहेत.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समिती आयोजित २९ गाव संवाद बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखेरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर घोषणा करण्यात आली.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उलवे शहर मनसे तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप