महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
मित्रपक्षाने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास आरपीआय समोर सर्व पर्याय खुले -सिद्राम ओहोळ
नवी मुंबई -:नवी मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री, पक्षाध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या उमेदवारांना मतदान केले आणि उमेदवार निवडून आले. परंतु यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असून यंदा प्रभाग रचना असल्याकारणाने युती करून ह्या निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. भाजप हा मित्रपक्ष आहे युती असल्याकारणाने आम्ही त्यांच्यासोबत आहोत. परंतु निवडणुकीत मित्रपक्षाने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास आरपीआयला सर्व पर्याय खुले असतील असे प्रतिपादननवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी केले.रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय तुर्भे येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती ह्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, युवक राज्य सरचिटणीस डॉ विजय मोरे, ठाणे लोकसभा अध्यक्ष यशपाल ओहोळ, नवी मुंबई सरचिटणीस एल. आर. गायकवाड, युवराज मोरे, टिळक जाधव, नंदा गायकवाड, कविता भंडारे, उषा कांबळे, बाबा माने, अभिमान जगताप, संतोष ढेपे, सुरेश कांबळे, फयाज शेख, विशाल खुपटे, गोविंद गायकवाड, दादा गायकवाड, आकाश गवई, बाळू शिरसाट, अतुल लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.