मोटार ट्रेलरच्या इंजिन व चेसिस नंबरमध्ये फेरफार

बनावटीकरण केलेले आरटीओ नंबरचे तीन ट्रेलर गुन्हे शाखेकडुन जप्त   

नवी मुंबई : कळंबोलीतील एका ट्रांसपोर्ट  व्यावसायीकाने त्यांच्याकडे असलेल्या तीन मोटार ट्रेलरचे टॅक्स वाचविण्यासाठी सदर ट्रेलरचे मुळ आरटीओ पासींग क्रमांक गाडयावरुन काढुन टाकुन त्याऐवजी त्या ट्रेलरवर त्यांच्याकडे असलेल्या मुळ वापरातील तीन मोटार ट्रेलरचे बनावटीकरण केलेले आरटीओ नंबर लावुन त्याचा व्यावसायासाठी वापर केल्याचे उघडकिस आले आहे. विशेष म्हणजे या ट्रांसपोर्ट  व्यावसायीकाने त्या तीन ट्रेलरच्या मुळ इंजिन व चेसिस नंबरमध्ये देखील फेरफार (लोकली पंच) केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने 45 लाख रुपये किंमतीचे 3 मोटार ट्रेलर जफ्त करुन ट्रांसपोर्ट व्यावसायीकाविरोधात फसवणुकिसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   

कळंबोली सेक्टर-8ई मधील बालाजी कॉम्फ्लेक्स येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सहा मोटार ट्रेलरपैकी प्रत्येकी दोन ट्रेलरचे क्रमांक हे एकसारखेच असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने प्रत्यक्ष  जागेवर जाऊन पहाणी केली असता, त्यांना एकाच क्रमांकाचे 2 ट्रेलर असे एकुण 6 ट्रेलर आढळुन आले. त्यामुळे गुन्हे शाखेने सदरच्या सहा मोटार ट्रेलरची आरटीओ कडून तपासणी करुन घेतली असता, तीन मोटार ट्रेलरचे इंजिन व चेसिस नंबर लोकली पंच केले असल्याचे आढळुन आले. तसेच उर्वतीत त्याच क्रमांकाच्या तीन मोटार ट्रेलरचे नंबर योग्य असल्याचे आरटीओने आपल्या तपासणी अहवालात माहिती दिली. त्यामुळे डुप्लिकेट नंबर असलेले 45 लाख रुपये किंमतीचे तीन मोटार ट्रेलर गुन्हे शाखा युनिट-3 ने ताब्यात घेतले. 

गुन्हे शाखेने या तीन ट्रेलरची माहिती काढली असता, सदरचे ट्रेलर हे सरताज फ्रेट कॅरिअर या ट्रांसपोर्टचे मालक जसपालसिंग संधू  यांचे असल्याचे आढळुन आले. तसेच संधू यांनी त्यांच्याकडे असलेल्या तीन मोटार ट्रेलरचे रोड टॅक्स वाचविण्याच्या हेतून त्यांच्या मुळ इंजिन व चेसिस नंबरमध्ये फेरफार (लोकली पंच) केल्याचे तसेच सदर मोटार ट्रेलरचे मुळ आरटीओ पासींग क्रमांक गाडयावरुन काढुन त्याऐवजी त्यांच्याकडे असलेल्या मुळ वापरातील मोटार ट्रेलरचे बनावटीकरण केलेले आरटीओ नंबर वापरुन शासनाची फसवणुक केल्याचे आढळुन आले. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने सरताज फ्रेट कॅरिअर या ट्रांसपोर्टचे मालक जसपालसिंग संधू यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सीबीडीत अवघ्या 2 तासात 4 लाख 52 हजाराची घरफोडी