सीबीडीत अवघ्या 2 तासात 4 लाख 52 हजाराची घरफोडी

नवी मुंबई : बंद घरे हेरुन घरफोडया करणा-या एका चोरटयाने सीबीडी सेक्टर-6 मधिल न्हावा अपार्टमेंटमध्ये अवघ्या दोन तासामध्ये घरफोडी करुन तब्बल 4 लाख 52 हजार रुपये किंमतीचा ऐजव चोरुन नेल्याचे उघडकिस आले आहे. सीबीडी पोलिसांनी या चोरटया विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. 

सीबीडी सेक्टर-6 मधील नाव्हा अपार्टमेंटमधील दुसऱया मजल्यावर युक्ती रामचंद्र चौबे (52) या आपल्या दोन मुलींसह राहण्यास आहेत. सोमवारी दुपारी युक्ती चौबे यांची  लहान मुलगी ही आपल्या कामावर निघुन गेल्यानंतर घरात युक्ती चौबे व त्यांची मोठी मुलगी या दोघीच घरी होत्या. सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास या दोघी आपल्या घराला लॅच लावुन डी-मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. याचदरम्यान अज्ञात चोरटयाने गॅलरीच्या सहाय्याने खिडकितून त्यांच्या घरामध्ये प्रवेश करुन त्यांच्या घरातील वेगवेगळ्या प्रकारचे सोन्या-चांदिचे तब्बल 4 लाख 52 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. दरम्यान, पावणे आठ वाजण्याच्या सुमारास युक्ती चौबे यांची मुलगी घरी आल्यानंतर त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचे उघडकिस आले. त्यानंतर त्यांनी सीबीडी पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरटया विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

उरण रहिवाशांच्या डोक्यावर मुत्यूची टांगती घंटा