देशातील केंद्र सरकार फसवे सरकार - विद्याताई चव्हाण

नवी मुंबई: देशात केंद्र सरकारचे राज्य येण्यापूर्वी इंधन,अन्न धान्याचा दरात वाढ झाल्यावर मोदी सरकार मधील मंत्री मोर्चे, आंदोलने करत असत. मंत्री स्मृती इराणी तर गॅसचे बाटले घेऊन रस्त्यावर मोर्चा काढत असे. त्यावेळी किमान इंधन, अत्यावश्यक अन्न धान्याच्या दरही कमी होते. पण हे सरकार देशात आल्यावर तर भाववाढीचा कडेलोट झाला आहे. वास्तविक पाहता ज्यांनी विरोधी पक्षात असताना आंदोलने केली. त्यांची आता सत्ता असताना भाव वाढतच चालले आहे. त्यांनी भाववाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे होते. पण केंद्रातील सरकार हे फसवे सरकार असून ते काहीही करत नसल्याची घणाघात टीका माजी आमदार व महिला प्रदेश अध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी दिघा येथे केली.

दिघा येथे नवी मुंबई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे व दिघा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा गौरी आंग्रे यांच्या वतीने दिघा येथील दत्त मंदिराच्या मैदानात ज्येष्ठ नागरिकांना छत्र्याचे वाटप व मोफत ज्येष्ठ कार्ड काढण्यात आले. त्यावेळी माजी आमदार विद्याताई चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, प्रदेश महिला सरचिटणीस भावना घाणेकर, नवी मुंबई महिला अध्यक्षा प्राजक्ता मोंडकर, गौरी आंग्रे, आयोजक अन्नू आंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी दिघा वाशीयांच्या धगधगत्या घरा विषयी प्रश्नावर हात घातला. जरी न्यायालयाचे आदेश काही असतील पण, आपल्या सरकारमध्ये पालक मंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः नगर विकास मंत्री आहेत. तर जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माण मंत्री आहेत. घरांच्या प्रश्र्नी योग्य तो सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना नागरिकांना घराच्या बाहेर काढण्याचा तिळमात्र अधिकार नाही असेही ठणकावून सांगितले.

या कार्यक्रमात पंधराशे ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप विद्याताई चव्हाण व प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्या. तर ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड ही काढण्यात आले. ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्याचे काम सतत सात दिवस चालू राहणार असल्याचे आयोजक अन्नू आंग्रे यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील झोपड्यांचा मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर पुनर्विकास