नेरूळमधील इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई :  नेरूळ सेक्टर -१७ मधील जिमी पार्क-१ या इमारत दुर्घटनेला सदर इमारतीचे निकृष्ट दर्जाचे काम करणारा बिल्डर तसेच सहाव्या मजल्यावर फ्लोरिंगचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर व त्याचे ३ लेबर जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी या सर्वाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेरुळ सेक्टर -17 मधील जिमी पार्क-१ या इमारतीच्या ए विंग मधील सहाव्या मजल्यावरील हॉल मधील स्लॅब कोसळल्याने सदर इमारतीतील पाच मजल्याचे स्लॅब एकावर एक कोसळण्याची घटना शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत स्लॅबच्या ढिगा-याखाली दबून व्यंकटेशन पार्थिवन नाडर (३१) याचा मृत्यू तर इतर  7 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य हाती घेऊन ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या 7 जणांना बाहेर काढले. त्यानंतर या सर्वांना नेरूळ मधील डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात जिमी पार्क इमारतीच्या सहाव्या मजल्या वरील  रूममधे दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने व त्याच्या 3 कामगारांनी सदर रूमच्या हॉलचा फ्लोअर कोसळुन इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल याची माहिती असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक निष्काळजीपणे रुमच्या दुरुस्तीचे काम केले. त्याचप्रमाणे सदर इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे सहाव्या मजल्यावरील हॉलचा स्लॅब कोसळून सदरची दुर्घटना घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी या इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेला सदर इमारतीचे निकृष्ट दर्जाचे काम करणारा आषुतोश डेव्लपर्स प्रायवेट लि चा बिल्डर, त्याचप्रमाणे सहाव्या मजल्यावर फलोरिंगचे काम करणारा कंत्राटदार शेख ए करिम सुलतान व त्याच्या सोबत काम करणारे इतर ३ लेबर या सर्वांविरोधात भादवि कलम ३०४ (२), ३३८, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

मोटार ट्रेलरच्या इंजिन व चेसिस नंबरमध्ये फेरफार