नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदारांची हातसफाई ?

नवी मुंबई -: नवी मुंबई महानगर पालीकेच्या वतीने शहरात पाणी भरू नये म्हणुन मान्सून पूर्व नाले सफाई केली जाते. मात्र या नालेसफाईत ठेकेदारांकडून नाल्यातील गाळ  बाहेर काढण्या ऐवजी तसाच  नाल्यात  सोडल्याचा प्रकार वाशी कोपरी नाल्यात घडला आहे. त्यामुळे नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदारांकदून हाथ सफाई करत मनपाच्या पैशावर डल्ला  मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.         

 नवी मुंबई शहरातील बेलापूर ते दिघा अशा आठही विभागांमध्ये अस्तित्वात असलेली मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे १५ मे पर्यत पूर्ण करन्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या होत्या.मात्र ही डेड लाईन संपल्यानंतर ही शहरात नाले सफाई सुरू होती.तर पावसाळ्यापूर्वी १००टक्के नाले सफाई पूर्ण करण्याचा दावा. मनपा करीत असते आणि त्यासाठी मनपा आयुक्त देखील दौरे आयोजित करून नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत आसतात.मात्र दुसरीकडे नाले सफाईच्या नावाखाली काही ठेकेदार हाथ सफाई करत असल्याचे समोर येत आहे.कारण नाले सफाई दरम्यान नाल्यातील गाळ बाहेर काढणे क्रमप्राप्त आहे.मात्र कोपरी नाल्यातील सफाई दरम्यान सबंधित ठेकेदाराने गाळ बाहेर काढण्याऐवजी तो नाल्यातच पसरवला आहे.जेणेकरून.भरतीच्या पाण्यात तो गाळ वाहून जाईल व ठेकेदाराचा  गाळ वाहून नेण्याचा वाहतूक खर्च वाचू शकेल. त्यामूळे नालेसफाई च्या आडून हातसफाई करत मनपाच्या पैशावर डल्ला मारण्याचा काम असले ठेकेदार करीत आहेत का?असा सवाल यानिमित्ताने नागरिक करत आहेत.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये कामगाराची हत्या करुन फरार झालेला आरोपी जेरबंद