महापेतील झाडे तोडण्यास विरोध वाढला

नवी मुंबई -:महापे एमआयडीसी  प्रशासनाकडून सुध्दा, कांक्रीटीकरण रस्त्याच्या बांधकामास अडथळा होत असल्याच्या निमीत्ताने २८२९, डेरेदार ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या वृक्षाची कत्तल करण्याचा घाट घातला आहे.

याला पर्यावरण प्रेमींसह  राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला आहे.तर परवाणगी आधीच वृक्ष तोड केल्याने. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्ष व पर्यावरण सेवाभावी संस्थेने केली.

महापे एम आयडी सी मध्ये रस्ता कांक्रीटीकरणाच्या नावाखाली २८२९ झाडांची कत्तल करण्याचा डाव आखला आहे.त्यास पर्यारणप्रेमींसह राजकीय पक्षांनी  सोमवारीआक्षेप घेतला होता. मात्र तरी देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यावर पर्यावरण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक ३१ मे रोजी कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्या दालनात ठिय्या देवून विना परवानगी वृक्ष तोड केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची  मागणी केली.सबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी  देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. महापे औद्योगिक परिसरात रस्त्याच्या कामासाठी सुमारे २८२९ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.या विरोधात पर्यावरण सेवाभावी संस्थेने आवाज उठवल्यावर आता सर्व पक्षीय स्तरावर हे झाडे कपण्यास विरोध होत आहे.कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्याशी चर्चा करूनही झाडे तोडण्यास विरोध होत आहे.याविरोधात भाजपचे  युवा जिल्हाउपाध्यक्ष संकेत डोके

आम आदमी पार्टी नवी मुंबईचे उपाध्यक्ष शेखर देशमुख यांनी, ह्या वृक्षतोडी साठी, नवी मुंबईतील  पर्यावरण रक्षणाचा विचार करून,  प्रशासनाकडे  लेखी हरकत घेत कारवाईची मागणी केली आहे. तर सदर

वृक्षतोड रोखली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नवी मुंबई आपने दिला आहे. विविध वृक्षप्रेमि नागरिकांनी कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांची भेट घेवून ही प्रक्रिया रोखण्याची मागणी केल्याने एम्आयडीसी प्रशासनाने परवानगी तोडलेल्या झाडांचा सर्व्हे करून येत्या दोन दिवसात संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पर्यावरण सेवाभावी संस्थेने सोमवारी याबाबत तक्रार दिल्यावर आज थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत तक्रार दिली आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदारांची हातसफाई ?