शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जी. एन. गुप्ता यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

खारघर : खारघर मधील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जी. एन. गुप्ता यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत शनिवारी (दि. २८) जाहीर प्रवेश केला. त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विनोद ठाकूर, दीपक शिंदे, गीता चौधरी, शैलेंद्र त्रिपाठी, अजिंक्य नवघरे आदी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खैरेणे मध्ये रिपब्लिकन सेना तर्फे  महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी