खैरेणे मध्ये रिपब्लिकन सेना तर्फे  महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

नवी मुंबई : खैरणे गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती २९ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्वप्रथम खैरणेगाव येथील चौकात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर वाजत गाजत महापुरुषांच्या प्रतिमा ठेवून रथासह भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 'रिपब्लिकन सेना'चे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे सासरे पांडुरंग साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'रिपब्लिकन सेना'चे नवी मुंबई जिल्हाप्रमुख खाजामिया पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक नगरसेवक मुनावर पटेल यांनीही आगरी, कोळी, मुस्लिम, बौद्ध बांधव गावात कसे एकोप्याने गुण्यागोविंदाने राहतात वर्षानुवर्षे ही परंपरा कायम असून गावातील एकता अबाधित आहे. असे सांगत नवी मुंबईतील नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. महापुरुषांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी वारंवार अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून तरुणांना प्रांतवाद, धर्मवाद यापासून दूर राहण्यासाठी मानवतावाद निर्माण करण्यासाठी महापुरुषांच्या जयंत्या रोज साजरा कराव्या असे खाजमिया पटेल यांनी नागरिकांना आवाहन केले. 

       यावेळी ऐरोली विधानसभा प्रमुख मा. प्रकाश वानखडे, उपाध्यक्ष दादा भालेराव, रिपब्लिकन युवा सेना प्रमुख सुनील वानखेडे, पत्रकार जय भालेराव, महापे विभाग प्रमुख यशवंत भालेराव यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे व महिला कार्यकर्त्या, बालक, बालिका, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कामगार नेते महेंद्र घरत आदर्श लोकसेवक 2022 पुरस्काराने सन्मानित