खारघर मंडल भाजपा तर्फे मविआ सरकारच्या विरोधात कंदील आंदोलन

खारघर: राज्यात होणाऱ्या विजटंचाई, भारनियमन व सुरक्षा अनामत रक्कम याबद्दल असलेली सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खारघर मंडल भाजपने सोमवारी सायंकाळी ७  शिल्प चौकात अंधार पडताच भाजपने कंदील आंदोलन केले. यावेळी खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती अॅड नरेश ठाकूर, महिला व बाल कल्याण सभापति  हर्षदा उपाध्याय, नगरसेवक प्रवीण पाटील,  निलेश बाविस्कार, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा पाटील, नगरसेविका अनिता पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा संध्या शारबीद्रे, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, सरचिटणीस साधना पवार, उत्तर रायगड जिल्हा सोशल मिडीया संयोजिका मोना अडवाणी, वैद्यकीय आघाडी संयोजक किरण पाटील, आदी उपस्थित होते.

वीजटंंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमाने हजारो कुटुंबीयांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सुरक्षा अनामत रकमेत दुप्पट वाढ करून महाविकास आघाडी सरकारने नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादल्याचा आरोप यावेळी अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केला.

तर भारतीय जनता पार्टी खारघर मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची तत्परता परंतु सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकीवर मात्र निष्क्रियता तसेच राज्यातील जनतेला भारनियमनात ढकलल्या संदर्भात ह्या परिसरात कंदील आंदोलन करून मविआ सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करीत असल्याचे सांगितले.

अश्याप्रकारे या कंदील आंदोलनाला भाजप कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांनी चांगला प्रतिसाद दिला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बेलापूरमध्ये महागाईविरोधात निदर्शने