मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बेलापूरमध्ये महागाईविरोधात निदर्शने 

नवी मुंबई : पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घेण्याबरोबरच महागाई कमी करण्यात यावी या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नवी मुंबई तालुका कमिटी तर्फे बुधवारी बेलापूर रेल्वे स्टेशन लगतच्या पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी महागाई विरोधातील पत्रकाचे वाटप देखील करण्यात आले.  

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी नरेश पाटील, बेलापूर शाखेच्या सचिव त्रिशीला कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंदोलनात महागाई कमी करा, रेशनिंगवर सर्वांना धान्य द्या, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या अशा विविध मागण्याचे फलक हातात धरुन निदर्शने करण्यात आली. या निदर्शनास सीबीडी बेलापुर स्टेशनवर ये-जा करणा-या नागरिकांनी वाढत्या महागाई विरोधात आपला संताप व्यक्त करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

 

Attachments area

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती