आम आदमी पार्टी राष्ट्रीय कार्यकारिणीची आप-नवी मुंबईला सदिच्छा भेट

नवी मुंबई : पंजाब निवडणुकीमध्ध्ये आप ला मिळालेल्या अद्भुतपूर्व यशा नंतर, आप राष्ट्रीय कार्यकारिणीने देशभर लक्ष केंद्रित करून, महाराष्ट्रासकट वेगवेगळ्या राज्यांमध्ध्ये प्रभारीपदाची नेमणूक केली आहे. ह्यापूर्वी महाराष्ट्र प्रभारी आणी निवडणूक निरीक्षक दुर्गेश पाठक, ह्याची नेमणूक हिमाचल प्रदेश येथे करण्यात आल्याने, आता दिल्ली येथील माजी आमदार दिपक सिंगला ह्यांची महाराष्ट्र राज्य प्रभारी, तसेच गोवा येथील माजी उद्योग मंत्री महादेव नाईक ह्यांना महाराष्ट्र राज्य निवडणूक निरीक्षक म्हणून नव्याने जबाबदारी देण्यात येत आहे. 

वरील नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या , राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांनी, तीन दिवसीय मुंबई मेट्रोपोलिटन विभागातील मीरा भाईंदर, वसई, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड इत्यादी विभागांचा दौरा केला. ह्या दरम्यान टीम आप नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर जमलेल्या स्थानिक कार्यकर्त्याच्या उपस्थिती मध्ध्ये नवीन राष्ट्रीय कायकारणी सदस्य आणि राज्य सचिव धनंजय शिंदे ह्यांचे स्वागत करण्यात आले. 

हि मिटिंग, कोपरखैरणे येथील, वॉर्ड अध्यक्ष आणि युवा नेते-आप नवी मुंबई,  सुमित कोटियन ह्यांच्या वॉर्ड ३८ च्या जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आली. प्रथम, नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, ह्यांच्या कडून पाहुण्यांची मराठी पध्धतीने ओवाळणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग ह्यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन, आणि पाहुण्यांचे स्वागत  करण्यात आले. 

त्यानंतर, श्यामभाऊ कदम, आप नवी मुंबई अध्यक्षांद्वारे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांना, एकदंरीत, गेल्या वर्षभरातील टीम आप नवी मुंबई च्या कामाचा आढावा आणि नवी मुंबई समिती सदस्यांची ओळख करून देण्यात आली. त्या नंतर, पाहुण्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. 

निवडणूक, जाहीरनाम्या मद्धे वचन दिल्याप्रमाणे, १ जुले पासून पंजाब मध्ध्ये सुध्दा ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफी ची अमलबजावणी करण्यात आली आहे, आजच्या घडीला, दिलेल्या वचनाला जगणारा एकमेव राजकीय पक्ष म्हणजे फक्त आप - राज्य निवडूक निरीक्षक महादेवजी नाईक.

आधीच इंधन दरवाढीमुळे, होलपळुन निघत असलेल्या सामान्य जनतेला दिलासा देण्या ऐवजी, प्रस्तापित राजकीय पक्ष धार्मिक भावना भडकावणारे विचार मांडून, देशाचे वातावरण गढूळ करीत आहेत, हे नक्कीच निषेधार्हय आहे - राज्य प्रभारी दिपक सिंगलाजी. 

हा कार्यक्रम, यशस्वी होण्यासाठी सुमित कोटियन (वॉर्ड ३८ अध्यक्ष , युवा नेते ) आणि कुटूंबीय, तसेच अजिंक्य कवठेकर (नवी मुंबई सचिव) ह्यांची मोलाची मदत झाली. सूत्र संचलनाची जबाबदारी नीना जोहरी (वॉर्ड ४२ अध्यक्ष, महिला नेत्या) ह्यांनी पार पाडली.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाविकास आघाडी सरकारमध्येच हुतूतू - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर