सीडब्ल्यूसी इम्पेक्स पार्क द्रोणागिरी नोड सीएफएसमध्ये राष्ट्रवादी कामगार संघटनेची स्थापना

उरण : सीडब्ल्यूसी इम्पेक्स पार्क द्रोणागिरी नोड सीएफएस मध्ये राष्ट्रवादी कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी प्रशांत भाऊ पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी व भावना ताई घाणेकर महिला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पनवेल निरीक्षक, विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्हाेकेट भार्गव पाटील, तालुका संघटक प्रकाश म्हात्रे, समाधान म्हात्रे युवक जिल्हा उपाध्यक्ष, सुनील तांडेल महालन विभाग अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशांत भाऊ पाटील, भावना ताई घाणेकर यांच्या शुभहस्ते फलकाचे अनावरण झाले यावेळी भावनाताई बोलताना म्हणाल्या की सर्व पक्षांची ताकद आम्ही कामगारांसोबत लावू कामगारांना योग्य ते न्याय मिळवून देऊ असे कणखर भाषेत सीडब्ल्यूसी इम्पेक्स पार्क प्रशासनाला सांगितले. तसेच या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भाऊ पाटील यांनी बोलताना माझी पूर्ण ताकद ही कामगारांसोबत राहील असे सांगितले. दोन वर्षे रखडलेला कामगारांबद्दलचा प्रश्न प्रशांत भाऊ पाटील यांनी त्वरित मार्गी लावल्या मुळे सर्व कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच इतर सीएफएस मध्ये देखील कामगार बदलीचा प्रश्न असेल तर तो मार्गी लावण्याची ताकद माझ्यात आहे असे प्रशांत भाऊ पाटील यांनी कामगार सोबत बोलताना सांगितले.

सीडब्ल्यूसी इम्पेक्स पार्क द्रोणागिरी नोड राष्ट्रवादी कामगार संघटनेची जबाबदारी ही राष्ट्रवादी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी अॅड. भार्गव पाटील व जनरल सेक्रेटरी प्रकाश म्हात्रे यांच्यावर दिलेली आहे. असे भाऊंनी सर्व कामगार बंधू व कामगार भगिनींना सांगितले. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे आश्वासन प्रशांत पाटील यांनी सर्वांना दिले. गेली 2 वर्षे कामगारांचे अनेक प्रश्न सुटत नव्हते. मात्र राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील व महिला नेत्या भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नातून कामगारांचे प्रश्न त्वरित मार्गी लागले. त्यामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मच्छिमारांच्या डिझेल तेलावरील वाढीव दरासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार