मच्छिमारांच्या डिझेल तेलावरील वाढीव दरासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार

नवी मुंबई: राज्यात समुद्र किनार पट्टीवर कोकण विभागातील सहा जिल्हे आहेत.तसेच देशातील लाखो मच्छिमारांचे कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहेत. त्यांना विशेष दर्जा निर्माण करून सवलत द्यावी.तसेच मच्छीमारांना वाढीव दराने पेट्रोलियम मदत असल्या बाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरिदास पुरी यांची राष्ट्रीय कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील व  शिष्टमंडळाने भेट घेतली.त्यावेळी केंद्रीय मंत्री पुरी यांनी तेलावरील वाढीव दरा संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री  सीतारामन यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री महरदीप सिंग पुरी  यांच्या निर्माण भवन, नवी दिल्ली कार्यालयात दिनांक ०७ एप्रिल रोजी दुपारी ०२.३० वाजता बैठक कोळी महासंघाचे अध्यक्ष,आमदार  रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील गोपाळ शेट्टी , महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सरचिटणीस किरण कोळी, भाजपा प्रदेशाध्यक्ष मच्छिमार सेल चेतन पाटील या मच्छिमारांच्या शिष्टमंडळानी देशातील मच्छिमारांना वाढीव दराने पेट्रोलियम पदार्थ मिळत असल्याबाबत भेट घेतली.

यावेळी प्रशासनाने  गुजरात व महाराष्ट्रात डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कर परत मिळत असल्यामुळे फक्त एक दोन रूपयांचा फरक राहीला आहे. व इतर सागरी राज्यांचा प्रश्न नाही. अशी चुकीची माहीती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतू आमदार  रमेश पाटील व किरण कोळी यांनी अक्षेप घेत सांगितले की, मूल्यवर्धित कर परतावा हा राज्यांचा विषय आहे. आम्ही किरकोल व घाऊक विक्रेत्या यामध्ये प्रति लिटर  रुपये २५ ते ३० रूपये फरक आहे. तो कमी करणेबाबत आलो आहोत. याबाबत दिनांक २८ मार्च २२ रोजी देखील शिष्टमंडळ आले होते.  आपण मच्छिमारांना विशेष दर्जा निर्माण करून सवलत द्यावी अशी विनंती केली. 

परंतु अधिकाऱ्यांची नकारात्मक भूमिकेमुळे आमदार  रमेश पाटील आक्रमक होत सन २०१३ मधील सरकारने सवलत दिली ती सवलत आपले सरकार का देऊ शकत नाहीत. मच्छिमारांमुळे सरकारवर फार मोठा अर्थिक बोजा पडणार नाही असे बजावले. त्यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केंद्रीय अर्थ मंत्री यांच्या कार्यालयात प्रस्ताव दिला आहे. लवकरच मच्छिमारांना पेट्रोलियम पदार्थावरील वाढीव दराबाबत केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतो असे आश्वासन दिले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरणच्या समस्या लवकरच प्राधान्याने सोडवू - जयंत पाटील