सानपाडा रेल्वे स्टेशनलगतचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न  

नवी मुंबई : अज्ञात चोरट्याने  गुरुवारी पहाटे सानपाडा रेल्वे स्टेशन लगत असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकिस आले आहे. या एटीएम मधून रक्कम चोरीला गेली नसल्याची माहिती सानपाडा पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.   

सानपाडा रेल्वे स्टेशनला लागून एसबीआय बँकेचे एटीएम असून या एटीएममध्ये गुरुवारी पहाटे घुसलेल्या एका चोरट्याने सदरचे एटीम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.  मात्र सदर चोरट्याला एटीएम मशीन मधून पैसे काढता आलेले नाही. गुरुवारी सकाळी एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला एटीएम मशीन फोडण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने या याबाबतची माहिती सानपाडा पोलिसांना दिली. त्यानंतर  पोलिसांनी या एटीएम सेंटरवर धाव घेतली.  

त्यानंतर त्यांनी सदर मशीनची तपासणी केली असता, गुरुवारी पहाटेच्या सुमारास एटीएममध्ये घुसलेल्या चोरट्याने  एटीएम मशीनमधून पैसे काढता न आल्याने एटीएमचे स्क्रीन फोडून त्याचे नुकसान केल्याचे आढळून आले. त्यामुळे सानपाडा पोलिसांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. 

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

नवी मुंबईतील भाजप आमदाराविरोधात महिलेची तक्रार