रस्त्यावर उभ्या गॅस वाहनांवर मनपाची कारवाई

नवी मुंबई-:वाशी कोपरखैरणे मार्गावर मरीआई मंदिरासमोर गॅस वितरकाकडून रस्त्यावर गॅस वाहने उभी करून गॅस हाताळणी केली जात असल्याने या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यता बळावली होती.त्यामुळे या गॅस वाहनांनवर वाशी अतिक्रमण विभागामार्फत बुधवारी धडक कारवाई करण्यात आली.

वाशी कोपरखैरणे मार्गावर जुहूगाव मरीआई मंदिरा समोर एच पी गॅस ची घरघुती सिलेंडर पुरवणारी  एजन्सी आहे.आणि या ठिकाणी  गॅस घेऊन रोज मोठी वाहने येत असतात. तर या मोठ्या वाहनांमधून शहारातील इतर  भागात गॅस पुरवठा करण्यासाठी छोट्या वाहनात गॅस सिलिंडर भरले जातात.या ठिकाणी रोज २५ ते ३०  वाहने  दोन ते तीन लेन मध्ये उभी असतात.तर  गॅस हाताळणी देखील रस्त्यावरच केली जाते. तसेच या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते.त्यामुळे एखादे  वाहन  या  गॅस च्या वाहनाला धडकण्याची  शक्यता नाकारता येत नाही..तर गॅस हाताळणी रस्त्यावरच होत असल्याने भविष्यात जर एखाद्या गॅस सिलिंडर चा  स्फोट झाला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही वाहने नागरी वस्तीपासून दूर ठेवावी जेणे करून या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी तर दूर होईलच शिवाय गॅस सिलिंडर मुळे जर एखादा स्फोट झाला तर होणारी हानी टाळता येऊ शकते त्यामुळे  या गॅस वाहनांवर  कारवाई  करण्यात यावी मगणी जोर धरू लागली होती.त्यानूसार वाशी विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक १६ मार्च रोजी येथी गॅस वाहनांवर  कारवाई करण्यात आली असून एकूण आठ वाहनांना जॅमर बसवले गेले तर या ठिकाणी अनधिकृत फेरिवाल्यांवर देखिल कारवाई करण्यात आली अशी माहिती वाशी अतिक्रमण विभागाने दिली.

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

एपीएमसीतील सत्रा प्लाझामधील पाम अटलांटिक हुक्का पार्लरवर पुन्हा कारवाई