महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा सुबिन थॉमस
नवी मुंबई: डिसेंबर २०२१ मध्ये लोकशाही पद्धतीने राज्य सहित नवी मुंबई युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस मधील तरुण आणि तरुणींनी युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सुबिन थॉमस यांना पाठींबा दिल्याने पुन्हा एकदा त्यांची नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली आहे.
युवक काँग्रेसच्या विविध पदासाठी तीन वर्षांचा कालखंड पूर्ण झाल्यावर होते. त्यानुसार १ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान तरुण व तरुणींनी मतदान प्रक्रिया राबविली गेली. यामध्ये युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये इतरांपेक्षा सुबिन थॉमस यांना साडे सहा हजारच्या आसपास मतदारांनी कौल दिल्याने सुबिन थॉमस हे पुन्हा एकदा तीन वर्षांसाठी अध्यक्ष पदावर राहणार आहेत.
सुबिन थॉमस हे मागील तीन वर्ष अध्यक्षपद सांभाळताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. यामध्ये कोरोनाच्या महामारीत मनपा रुग्णालये, बेघर, निराश्रित, एमआयडीसी मधील विविध ठिकाणे,उड्डाणपूल खाली वास्तव्यास असणाऱ्या घटकांना सातत्याने पोटाला आधार दिला. तसेच केंद्र शासनाच्या विविध चुकीच्या धोरणांना विरोध करत अनेक आंदोलने केली. कृषी कायदा व इंधन दरवाढ विरोधात युवक काँगेस कडून रणकंदन केले होते. तसेच नवी मुंबईतील विविध पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबविली होती. यामध्ये चाळीस हजारांच्या वर नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.