खारघर  काँग्रेसच्या वतीने महिला दिन साजरा

खारघर: खारघर शिल्प चौकात काँग्रेसच्या वतीने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा अनुपमा चढुआ, भारती जळगावकर, सायरा अहमद, किरण तळेकर, खारघर शहर महिला अध्यक्ष हप्रीत कौर बैंस,उपाध्यक्ष  शेहनाझ पटेल उपस्थित होत्या. यावेळी अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याचा संकल्प महिलांनी केला. यावेळी खारघर सेक्टर पस्तीसच्या अध्यक्ष पदी इशिका सुधीजा, सेक्टर दहा नूतन सिंग तर सेक्टर पंधराच्या अध्यक्ष पदी मेहेरनुसीन यांची नियुक्ती करण्यात आली. खारघर शहराच्या लोकसंख्येत वाढ होत असून सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरात काँग्रेस पक्ष वाढीसाठी विविध उपक्रम राबवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे असा सल्ला खारघर शहर महिला अध्यक्ष हप्रीत कौर बैंस,यांनी उपस्थित महिलांना दिला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरण विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी रोहित घरत