महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
महिलांचा सन्मान करून विजय चौगुले यांचा वाढदिवस साजरा
नवी मुंबई : ऐरोली प्रभाग क्रमांक 3 साईबाबा नगर, रबाले येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना न. मुं. म.पा. मा. माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा वाढदिवस यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे महिलांचा सत्कार समारंभ व प्रबोधन पर सांस्कृतिक गीत संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे स्थानिक लोकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
समाजसेवक तथा शिवसेनेचे कार्यकर्ते गणेश भिमराव दगडे व त्यांच्या सहचारिणी समाजसेविका सौ.ज्योती गणेश दगडे यांच्या नेतृत्वात हळदी कुंकू व महिला संकल्प मेळाव्याचे आयोजन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते सोडत काढून नऊवारी पैठणी साड्या विजेत्यांना वाटप करण्यात आल्या. याशिवाय महिला पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील पंचवीस वर्षापासून साईनगर येथील लोकांच्या वॉटर, मीटर, गटर मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. स्थानिक रहिवासी, उत्तर भारतीय, साउथ इंडियन, मराठी, गुजराती, बंगाली, मारवाडी विविध समाजाचे लोक प्रेमापोटी व विश्वास संपादन केल्याने ते शिवसेनेला निवडून देतील असा ठामविश्वास गणेश दगडे यांना आहे. याशिवाय कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी हा बदल घडवू असा संकल्प केला आहे. असे सांगत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्याद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक शिवसैनिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.